महिलांसाठी वाई रोटरीतर्फे शेंदुरजणे येथे कॅन्सर तपासणी शिबिर उत्साहात*


निरंजना न्यूज नेटवर्क – निलेश बाबर

महिलांनी आरोग्याबाबत जागरूक रहावे- माजी प्रांतपाल स्वाती हेरकळ*

रोटरी क्लब ऑफ वाई व कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट, कराड संयुक्त यांच्या विद्यमाने पंचवक्त्र फाउंडेशन, पाचगणी यांच्या सहयोगाने महिलांसाठी कॅन्सर तपासणी शिबिर मॅप्रो गार्डन, शेंदुरजणे येथील मॅप्रोच्या नेत्र चिकित्सालयात पार पडले. या कार्यक्रमाच्या वेळी रोटरीच्या ३१३२ प्रांताच्या माजी प्रांतपाल स्वाती हेरकळ यांनी शिबिरास उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. सातत्याने रोटरी क्लबतर्फे असे प्रकल्प ठिकठिकाणी, जेथे महिला मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहेत, त्या ठिकाणी रोटरी आशा एक्सप्रेस या फिरत्या कर्करोग तपासणी आणि जनजागृती मोहीमेद्वारे आम्ही आयोजित करणार आहोत. महिलांनी अशा तपासणी शिबिरांचा निश्चितपणे लाभ घ्यावा आणि आपल्या आरोग्याच्या बाबतीत सदैव जागरूक रहावे, असे आवाहन त्यांनी केले. मॅप्रो कंपनीचे प्रमुख श्री. मयूरभाई व्होरा व पंचवक्त्र फाउंडेशनच्या अधिकारी पूजा पांगारे यांनीही उपस्थित शिबिरार्थींना मार्गदर्शन केले. उद्घाटनाच्या कार्यक्रमास माजी प्रांतपाल स्वाती हेरकळ, रोटरी क्लब ऑफ वाईचे अध्यक्ष कुणाल शहा, रो. डॉ. सिद्धांत कद्दू, रो. पूरब शहा व रो. नीला कुलकर्णी तसेच कराड कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टच्या २० डॉक्टरांची टीम डॉक्टर वैशाली मोहिते यांच्या समवेत उपस्थित होती. या कॅन्सर तपासणी शिबिराचा लाभ १५० हून अधिक महिलांनी घेतला. महिलांमधील कॅन्सर तपासणीच्या महत्त्वाच्या जागरूकतेसाठी २० डिसेंबर २०२५ रोजी सकाळी साडेसात ते साडेनऊ या दरम्यान वाई शहरातून मोठी शोभायात्रा निघणार आहे. वाईतील सर्व सामाजिक संस्थांनी या रॅलीमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन रोटरी क्लब ऑफ वाईचे अध्यक्ष कुणाल शहा यांनी केले आहे.


116
कृपया वोट करा

निरंजना न्यूज नेटवर्कच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!