NIRANJANA NEWS NETWORK

भुईंज पोलिसांची सतर्कता; सुरूर मध्ये बालविवाह रोखला ! पोलिसांची घटनास्थळी धाव; पालकांचे समुपदेशन;
निरंजना न्यूज़ नेटवर्क

भुईंज, दि. ३० प्रतिनिधी :

सुरूर, ता. वाई येथे एका समाजातील अल्पवयीन मुलीचा त्याच समाजातील युवकाशी विवाह लावण्यात येणार असल्याची माहिती मिळताच भुईंज पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत सतर्कता दाखवत होणारा बालविवाह रोखला. पोलिसांच्या या तत्पर कारवाईमुळे अल्पवयीन मुलीचे बालविवाहापासून संरक्षण झाले.

सुरूर परिसरात अल्पवयीन मुलीचा विवाह होणार असल्याची माहिती भुईंज पोलीस ठाण्याला मिळाली. माहितीची गांभीर्याने दखल घेत परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक पुनम झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, पोलीस उपनिरीक्षक आकाश शिंदे, सुरज शिंदे, बीट अंमलदार आप्पासाहेब कोलवडकर, महिला पोलीस हवालदार पुनम बांगर तसेच महिला पोलीस पाटील निर्मला पवार यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी संबंधित कुटुंबीयांशी संवाद साधून अल्पवयीन मुलीचा विवाह लावणे कायद्याने गुन्हा असल्याचे समजावून सांगितले. तसेच पालकांचे समुपदेशन व प्रबोधन करून बालविवाहाचे दुष्परिणाम आणि त्यातून निर्माण होणाऱ्या अडचणींबाबत माहिती देण्यात आली. पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे होणारा विवाह थांबविण्यात आला.

दरम्यान, या कारवाईची माहिती सुरूर परिसरात पसरताच नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले. अल्पवयीन मुलीच्या आयुष्याचा महत्त्वाचा टप्पा वाचवण्यासाठी भुईंज पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि संवेदनशीलता कौतुकास्पद असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. बाल विवाहासारख्या सामाजिक अनिष्ट प्रथांविरोधात पोलिसांनी घेतलेल्या भूमिकेचे परिसरातून स्वागत होत आहे.

The post भुईंज पोलिसांची सतर्कता; सुरूर मध्ये बालविवाह रोखला !  पोलिसांची घटनास्थळी धाव; पालकांचे समुपदेशन; appeared first on NIRANJANA NEWS NETWORK.

सुरूर मध्ये देशी पिस्टल सह इसम ताब्यात; भुईंज पोलिसांची मध्यरात्रीच्या पेट्रोलिंग मध्ये धडक कारवाई; ४५ हजारांचे देशी बनावटीचे पिस्टल जप्त ;
निरंजना न्यूज नेटवर्क

भुईंज प्रतिनिधि –

भुईंज, दि २९ प्रतिनिधी : भुईंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत मध्यरात्री सुरू असलेल्या पेट्रोलिंग दरम्यान सुरूर ता. वाई येथील ब्रिजखाली कमरेला देशी बनावटीचे पिस्टल लावून उभ्या असलेल्या संशयितास भुईंज पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून सुमारे ४५ हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्टल जप्त करण्यात आले. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

दिनांक २८ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री २.१५ वाजण्याच्या सुमारास सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे हे पोलीस हवालदार नितीन जाधव, आप्पा कोलवडकर, पोलीस शिपाई सोमनाथ बल्लाळ व सागर मोहिते यांच्यासह सरकारी वाहनातून भुईंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत होते.

पेट्रोलिंग दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांना गोपनीय बातमी दारामार्फत माहिती मिळाली की, सुरूर गावच्या हद्दीतील सुरूर ब्रिजखाली सदर इसम हा कमरेला पिस्टल लावून उभा आहे.

माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने दोन पंचांना बोलावून घेतले. त्यानंतर पोलीस पथक पंचांसह माहिती मिळालेल्या ठिकाणी दाखल झाले. तेथे बातमीदाराने दिलेल्या वर्णनाप्रमाणे एक इसम संशयितरित्या उभा असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला एक देशी बनावटीचे पिस्टल आढळून आले.

पोलिसांनी सदर पिस्टल जप्त करून संशयिता विरुद्ध भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २८९/२०२६, शस्त्र अधिनियम कलम ३/२५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१), (३) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

सदर आरोपीस वाई येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले असता न्यायालयाने त्यास चार दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. आरोपीकडून जप्त करण्यात आलेल्या पिस्टलची किंमत अंदाजे ४५ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ही कारवाई सातारा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, वाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक पूनम झगडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, पोलीस हवालदार नितीन जाधव, आप्पा कोलवडकर, पोलीस शिपाई सोमनाथ बल्लाळ व सागर मोहिते यांनी केली.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आकाश मोरे करीत आहेत.

The post सुरूर मध्ये देशी पिस्टल सह इसम ताब्यात; भुईंज पोलिसांची  मध्यरात्रीच्या पेट्रोलिंग मध्ये  धडक कारवाई; ४५ हजारांचे देशी बनावटीचे पिस्टल जप्त ; appeared first on NIRANJANA NEWS NETWORK.

खा. नितीन पाटील यांची NHAI अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक; महामार्गालगतच्या नागरिकांचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवण्याच्या सूचना
निरंजना न्यूज नेटवर्क – निलेश बाबर

सातारा : पुणे–सातारा तसेच शिरवळ–लोणंद महामार्गालगतच्या नागरिकांना भेडसावणाऱ्या गंभीर समस्या, वाहतूक कोंडी आणि रस्ते सुरक्षेशी संबंधित प्रलंबित प्रश्नांवर आज खासदार नितीन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक पार पडली.

या बैठकीत शिरवळ, खंडाळा, वेळे, सुरूर, भुईंज, उडतारे यांसारख्या महामार्गालगतच्या गावांमधील स्थानिक नागरिक, शेतकरी आणि लोकप्रतिनिधींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. स्थानिक नागरिकांनी सर्व्हिस रोडची दुरवस्था, अंडरपास आणि उड्डाणपुलांची आवश्यकता, अपुरे पथदिवे, पाणी साचण्याच्या समस्या आणि धोकादायक वळणांमुळे होणारे अपघात यांसारख्या प्रमुख अडचणी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्या.

नागरिकांच्या मागण्या आणि व्यथा ऐकून घेतल्यानंतर खा. नितीन पाटील यांनी NHAI च्या अधिकाऱ्यांना तात्काळ घटनास्थळी पाहणी करून ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. “महामार्गाचा विस्तार आणि विकास होत असताना स्थानिक नागरिकांच्या दैनंदिन सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. सर्व्हिस रोडचे रखडलेले काम आणि अंडरपासच्या समस्या प्राधान्याने सुटल्या पाहिजेत या संदर्भात चर्चा करण्यात आल्या.

या महत्त्वपूर्ण बैठकीस NHAI चे प्रोजेक्ट मॅनेजर श्री. सचिन गौतम, श्री. पाटील यांच्यासह प्राधिकरणाचा संपूर्ण अधिकारी वर्ग उपस्थित होता. तसेच मा. बकाजीराव पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उदयदादा कबुले, अशोक धायगुडे, संभाजी साळुंखे, डॉ. जोगळेकर, राजेंद्र तांबे, जिल्हा परिषद सदस्या वृषाली चव्हाण, कांतीलाल पवार, आत्माराम नाना सोनवणे, राजेंद्र सोनवणे, सुधीर पाटील, सुजित जाधवराव यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य

महामार्गावरील आधुनिक सुविधांसोबतच लगतच्या गावकऱ्यांचा प्रवास सुखरूप आणि त्रासमुक्त कसा होईल, यावर प्रशासनाने भर दिला पाहिजे. नागरिकांच्या प्रत्येक वाजवी मागणीवर प्रशासनाकडून सकारात्मक निर्णय होईपर्यंत सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन खा. नितीन पाटील यांनी दिले.

The post खा. नितीन पाटील यांची NHAI अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक; महामार्गालगतच्या नागरिकांचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवण्याच्या सूचना appeared first on NIRANJANA NEWS NETWORK.

गणेशोत्सवाची चाहूल : जिल्हाभरातील कुंभारवाड्यांत गणेशमूर्ती घडविण्याची लगबग; आकर्षक, सुबक शाडू मूर्तींना वाढते प्राधान्य
निरंजना न्यूज नेटवर्क – निलेश बाबर

: अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाभरातील कुंभारवाड्यांमध्ये गणेशमूर्ती घडविण्याची लगबग सुरू झाली आहे. पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत कारागीर गणरायाला आकर्षक, देखणा आणि भावपूर्ण स्वरूप देण्यासाठी मेहनत घेत आहेत. यंदा पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला अधिक महत्त्व मिळत असल्याने शाडू मातीच्या गणेशमूर्तींना नागरिकांकडून मोठी पसंती मिळत आहे. त्यामुळे शाडूच्या मूर्ती तयार करण्यासाठी कारागीरांची विशेष कसरत सुरू असून अनेक ठिकाणी मंडळे आणि घरगुती गणेशभक्तांकडून आगाऊ नोंदणीही पूर्ण झाली आहे.

जिल्ह्यातील विविध कुंभारवाड्यांमध्ये सध्या गणेशमूर्ती तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. प्रथम माती मळणे, साचे तयार करणे, मूर्तीला आकार देणे, वाळविणे, त्यानंतर रंगकाम आणि अंतिम सजावट अशी प्रत्येक प्रक्रिया अत्यंत बारकाईने केली जात आहे. गणरायाच्या चेहऱ्यावरील भाव, डोळ्यांची रचना, अलंकार आणि सिंहासन यामध्ये आकर्षकता आणण्यासाठी कारागीर विशेष मेहनत घेत आहेत. प्रत्येक मूर्ती भक्तांच्या मनात श्रद्धा निर्माण करणारी व्हावी, यासाठी प्रत्येक टप्प्यावर गुणवत्ता राखली जात आहे.

यंदा पर्यावरण संवर्धनाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती वाढल्याने शाडू मातीच्या मूर्तींची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींपेक्षा शाडूच्या मूर्ती पाण्यात सहज विरघळतात आणि जलप्रदूषण कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे अनेक गणेश मंडळे तसेच घरगुती गणेशभक्त शाडूच्या मूर्तींनाच प्राधान्य देताना दिसत आहेत. काही कारागीरांनी नैसर्गिक रंगांचा वापर करून पर्यावरणपूरक मूर्ती तयार करण्यावर भर दिला आहे.

गणेश मंडळांकडून मोठ्या आकाराच्या मूर्तींसाठी अनेक महिन्यांपूर्वीच आगाऊ नोंदणी करण्यात आली आहे. याशिवाय घरगुती गणेशमूर्तींसाठीही मोठ्या प्रमाणावर बुकिंग सुरू आहे. ग्राहकांच्या आवडीनुसार विशिष्ट आकार, रंगसंगती आणि सजावटीसह मूर्ती तयार करून देण्याचे काम सुरू असल्याने कारागीरांवर कामाचा ताण वाढला आहे. वेळेत सर्व मूर्ती तयार करून देण्यासाठी अनेक ठिकाणी संपूर्ण कुटुंबच या कामात सहभागी झाले आहे.

महागाईमुळे शाडू माती, रंग, सजावटीचे साहित्य आणि वाहतूक खर्च वाढला असला तरी गणेशभक्तांचा उत्साह कमी झालेला नाही. दर्जेदार आणि आकर्षक मूर्तीसाठी नागरिक अतिरिक्त खर्च करण्यासही तयार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामाकडून कारागीरांना चांगल्या व्यवसायाची अपेक्षा आहे.

गणेशोत्सव हा केवळ धार्मिक सण नसून तो कला, संस्कृती आणि परंपरेचा उत्सव आहे. कुंभारवाड्यातील कारागिरांच्या कुशल हातातून साकार होणाऱ्या गणरायाच्या मूर्ती या त्यांच्या अनेक वर्षांच्या अनुभवाचे आणि कलेचे प्रतीक आहेत. या कलेला जपण्यासाठी आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी शाडूच्या मूर्तींची निवड करणे ही काळाची गरज असल्याचे मत पर्यावरणप्रेमी आणि कारागीर व्यक्त करत आहेत.

यंदाही जिल्हाभरात आकर्षक, सुबक आणि पर्यावरणपूरक गणेशमूर्तींच्या माध्यमातून गणेशोत्सव उत्साहात साजरा होणार असून कुंभारवाड्यांमध्ये सुरू असलेली ही लगबग गणेश आगमनाची चाहूल देत आहे.

The post गणेशोत्सवाची चाहूल : जिल्हाभरातील कुंभारवाड्यांत गणेशमूर्ती घडविण्याची लगबग; आकर्षक, सुबक शाडू मूर्तींना वाढते प्राधान्य appeared first on NIRANJANA NEWS NETWORK.

*उडतरे येथे बंद पथदिव्यांमुळे भीषण अपघाताची टांगती तलवार; रात्रीच्या अंधारामुळे वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर “
निरंजना न्यूज नेटवर्क – निलेश बाबर

लाखो रुपयांचा निधी धुळीस; प्रशासनाला अपघातात कोणाचा जीव गेल्यावरच जाग येणार का?*

पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील उडतरे (ता. वाई) येथील सेवा रस्त्यावर गेल्या अनेक दिवसांपासून अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. तरी संबंधित यंत्रणा आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला (NHAI) अजूनही जाग आलेली नाही. प्रशासनाच्या या अडेलतट्टू धोरणामुळे स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली असून, “अपघातात कोणाचा नाहक बळी गेल्यावरच हे पथदिवे सुरू होणार का?” असा आक्रमक सवाल आता विचारला जात आहे.

महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांकडून दररोज लाखो रुपयांचा टोल वसूल केला जातो. तसेच सेवा रस्त्याच्या सुशोभीकरणासाठी आणि सुरक्षेसाठी लाखो रुपये खर्च करून हे पथदिवे उभारण्यात आले आहेत. मात्र, केवळ योग्य देखभालीअभावी हे दिवे धुळखात पडले आहेत. प्रशासनाच्या या अनास्थेमुळे लाखो रुपयांचा सार्वजनिक निधी थेट पाण्यात गेल्याचे स्पष्ट दिसत आहे.

सेवा रस्त्यावर दिवस-रात्र वाहनांची मोठी वर्दळ असते. रात्रीच्या वेळी अंधारामुळे रस्त्यावरील दुभाजक (Divider), अचानक समोर येणारे खड्डे आणि रस्त्याच्या कडेला उभी असलेली अवजड वाहने चालकांना दिसत नाहीत. परिणामी, दररोज लहान-मोठे अपघात घडत आहेत. विशेषतः दुचाकीस्वारांसाठी हा रस्ता म्हणजे ‘मृत्यूचा सापळा’ बनला आहे.

त्याच बरोबर

अंधाराचा फायदा घेऊन या भागात अनुचित प्रकार घडण्याची किंवा चोरी-लुटमारीसारख्या गुन्हेगारी घटना वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या महिला, ज्येष्ठ नागरिक आणि स्थानिक ग्रामस्थांच्या सुरक्षेचा प्रश्न या लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे अत्यंत गंभीर बनला आहे.

The post *उडतरे येथे बंद पथदिव्यांमुळे भीषण अपघाताची टांगती तलवार; रात्रीच्या अंधारामुळे वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर “ appeared first on NIRANJANA NEWS NETWORK.

भुईंज पोलीस ठाण्याचा कायापालट; सातारा – पुणे महामार्गावरील अद्ययावत पोलीस ठाणे म्हणून नवी ओळख ;
निरंजना न्यूज नेटवर्क – निलेश बाबर

प्रवेशद्वारावरील दत्त मंदिरामुळे आध्यात्मिक वातावरणाची अनुभूती ; रमेश गर्जे यांचे योगदान; पृथ्वीराज ताटेंकडून उभारी;

सातारा-पुणे महामार्गावरील महत्त्वाचे पोलीस ठाणे म्हणून ओळख असलेल्या भुईंज पोलीस ठाण्याने आता सुसज्ज व अद्ययावत पोलीस स्टेशन म्हणून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. पोलीस ठाण्यात आवश्यक त्या अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देतानाच, महिला कक्ष, दुय्यम अधिकारी कक्ष, बिट अंमलदार विश्रांती कक्ष, यासह गुन्हे प्रकटीकरण शाखेला ही सक्षम स्वरूप देण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारी, गुन्ह्यांचा तपास आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने भुईंज पोलीस ठाण्याची कार्यक्षमता अधिक प्रभावी झाली आहे.

भुईंज पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारावरच असलेले दत्त मंदिर हे या पोलीस ठाण्याचे आणखी एक वैशिष्ट्य ठरले आहे. कर्तव्यावर रुजू होताना अनेक पोलीस अधिकारी व कर्मचारी प्रथम गुरुदत्ताचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतात आणि त्यानंतर आपल्या कामाला सुरुवात करतात. त्यामुळे पोलीस ठाण्याच्या परिसरात कर्तव्य भावनेसह सकारात्मक व आध्यात्मिक वातावरणाची अनुभूती येते.

भुईंज पोलीस ठाण्याला सुसज्ज करण्यासाठी बदली झालेले तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांनी विशेष प्रयत्न केले. पोलीस ठाण्यातील आवश्यक सुविधा, कार्यालयीन व्यवस्था तसेच गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कामकाजासाठी आवश्यक बाबींवर त्यांनी विशेष लक्ष दिले. त्यांच्या कार्यकाळात पोलीस ठाण्याला अधिक शिस्तबद्ध व सुसज्ज स्वरूप प्राप्त झाल्याने त्यांच्या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

पोलीस ठाण्यात येणाऱ्या नागरिकांना आपली तक्रार मांडताना अडचण येऊ नये, तसेच पोलिसांना तपास व प्रशासकीय कामकाज अधिक परिणामकारकपणे करता यावे, यासाठी उपलब्ध सुविधांचा चांगल्या पद्धतीने वापर केला जात आहे.

दरम्यान, भुईंज पोलीस ठाण्याचा कारभार स्वीकारलेले नवीन सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनीही पोलीस ठाण्याच्या कामकाजाला नवी उभारी दिली आहे. महामार्गावरील वाहतूक, अपघात, गुन्हेगारी तसेच परिसरातील कायदा-सुव्यवस्था या विविध बाबींवर लक्ष केंद्रित करून नागरिकांना सुरक्षित वातावरण देण्याच्या दृष्टीने पोलीस यंत्रणा कार्यरत आहे.

सातारा-पुणे महामार्गावरील भुईंज परिसर हा वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा भाग असल्याने या पोलीस ठाण्यावर मोठी जबाबदारी आहे. महामार्गावरील वाढती वाहतूक, अपघातांची शक्यता, स्थानिक गुन्हेगारी तसेच विविध सामाजिक प्रश्नांचा सामना करताना आधुनिक सुविधा आणि सक्षम मनुष्यबळाचा मोठा फायदा होत आहे.

भुईंज पोलीस ठाण्यातील बदलामुळे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कामासाठी चांगले वातावरण मिळत असून, नागरिकांनाही पोलीस ठाण्यातील सुविधांचा लाभ मिळत आहे. गुन्हे प्रकटीकरण शाखेपासून कार्यालयीन व्यवस्थे पर्यंत झालेली सुधारणा आणि नवीन नेतृत्वामुळे भुईंज पोलीस ठाणे आता सातारा-पुणे महामार्गावरील अद्ययावत व सुसज्ज पोलीस स्टेशन म्हणून नावारूपाला येत आहे.

भुईंज पोलीस ठाण्याला सुसज्ज रूप देण्यासाठी योगदान देणारे तत्कालीन सपोनि रमेश गर्जे तसेच सध्याचा कारभार अधिक सक्षमपणे पुढे नेणारे सपोनि पृथ्वीराज ताटे यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्याचे नागरिकांकडून कौतुक होत आहे. भविष्यातही नागरिकांच्या सुरक्षिततेला केंद्रस्थानी ठेवून भुईंज पोलीस ठाण्याचा कारभार अधिक प्रभावीपणे सुरू राहण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

*कर्तव्याला सुरुवात करण्यापूर्वी दत्तगुरूंचा आशीर्वाद*– भुईंज पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारावर असलेले दत्त मंदिर हे या ठिकाणाचे वैशिष्ट्य ठरले आहे. दिवसभर कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी धावपळ करणारे अधिकारी व कर्मचारी अनेकदा कर्तव्याच्या सुरुवातीला श्री दत्ताचे दर्शन घेतात. त्यामुळे पोलीस ठाण्याच्या परिसरात भक्ती आणि कर्तव्य यांचा अनोखा संगम पाहायला मिळतो.

‘कर्तव्याला सुरुवात करण्यापूर्वी दत्तगुरुंचा आशीर्वाद’ अशी भावना अनेक अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये दिसून येते. त्यामुळे हे मंदिर केवळ धार्मिक स्थळ न राहता पोलीस कर्मचाऱ्यांसाठी मानसिक आधार आणि सकारात्मक ऊर्जेचे केंद्र ठरत आहे.

*सपोनी रमेश गर्जे व सपोनी पृथ्वीराज ताटे यांचे सर्व स्तरातून कौतुक* –– तत्कालीन सपोनि रमेश गर्जे यांनी केलेल्या पायाभूत सुधारणांमुळे भुईंज पोलीस ठाण्याला अद्ययावत व सुसज्ज स्वरूप मिळाले, तर सध्याचे सपोनि पृथ्वीराज ताटे यांनी या व्यवस्थेला पुढे नेत कारभाराला नवी उभारी दिली आहे. त्यामुळे भुईंज पोलीस ठाणे आता केवळ एक नियमित पोलीस ठाणे न राहता सातारा-पुणे महामार्गावरील अद्ययावत, सुसज्ज आणि नागरिकाभिमुख पोलीस स्टेशन म्हणून नावारूपाला येत असून नागरिकांकडून सपोनी रमेश गर्जे व सपोनी पृथ्वीराज ताटे यांचे कौतुक होत आहे.

The post भुईंज पोलीस ठाण्याचा कायापालट; सातारा – पुणे महामार्गावरील अद्ययावत पोलीस ठाणे म्हणून नवी ओळख ; appeared first on NIRANJANA NEWS NETWORK.

उडतरे येथील महामार्गावरील सर्विस रोड वरील पथदिवे बंद; रात्रीच्या अंधारामुळे अपघाताचा धोका वाढला
निरंजना न्यूज नेटवर्क – निलेश बाबर

उडतरे : प्रतिनिधी – निलेश बाबर

उडतरे येथून जाणाऱ्या महामार्गावर वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी उभारण्यात आलेले पथदिवे रात्रीच्या वेळी बंद राहत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. लाखो रुपये खर्च करून बसविण्यात आलेल्या या पथदिव्यांचा उपयोगच होत नसल्याने संबंधित यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

उडतरे परिसरातून जाणाऱ्या महामार्गावर आणि सर्विसरोड वर दिवस-रात्र मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. विशेषतः रात्रीच्या वेळी अवजड वाहने, चारचाकी तसेच दुचाकी वाहनांची संख्या मोठी असते. महामार्गावरील काही ठिकाणी वळणे, दुभाजक तसेच रस्त्याच्या कडेला असलेली वाहतूक व्यवस्था लक्षात घेता पुरेशा प्रकाशाची आवश्यकता असते. मात्र, पथदिवे बंद असल्याने अनेक ठिकाणी रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य पसरते.

लाखो रुपये खर्च, तरीही पथदिवे बंद

महामार्गाचे सुशोभीकरण व सुरक्षितता वाढविण्याच्या उद्देशाने उभारण्यात आलेल्या पथदिव्यांवर मोठा खर्च करण्यात आला आहे. मात्र, दिवे नियमित सुरू राहत नसतील तर या सुविधेचा अपेक्षित फायदा वाहनचालकांना मिळणार कसा, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. पथदिव्यांची देखभाल, वीजपुरवठा आणि तांत्रिक बिघाड याबाबत संबंधित विभागाने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.

पावसाळ्यात ढगाळ वातावरण, पावसाची सर आणि कमी दृश्यमानता यामुळे रात्री वाहन चालविताना आधीच अडचणी निर्माण होतात. त्यात महामार्गावरील पथदिवे बंद असल्याने रस्ता, दुभाजक आणि बाजूला उभी असलेली वाहने वेळेत दिसत नसल्याची तक्रार वाहनचालकांकडून होत आहे. परिणामी अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.

विशेषतः दुचाकीस्वारांसाठी ही परिस्थिती अधिक धोकादायक ठरू शकते. अचानक समोर येणारा अडथळा, रस्त्याच्या कडेला उभे असलेले वाहन किंवा दुभाजकाचा अंदाज न आल्यास अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

उडतरे परिसरातील बंद असलेले सर्व पथदिवे तातडीने तपासून त्यातील तांत्रिक बिघाड दूर करावा, वीजपुरवठा सुरळीत आहे की नाही याची पाहणी करावी तसेच पथदिव्यांची नियमित देखभाल करण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिक व वाहनचालकांकडून होत आहे.

महामार्गावरील पथदिवे केवळ शोभेसाठी न राहता रात्रीच्या वेळी प्रत्यक्षात सुरू राहणे आवश्यक आहे. एखादी दुर्घटना घडल्यानंतर उपाययोजना करण्याऐवजी त्यापूर्वीच संबंधित विभागाने दखल घेऊन पथदिवे सुरू करावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

उडतरे येथील महामार्गावरील पथदिव्यांची तातडीने पाहणी करून बंद दिवे सुरू करण्याची कार्यवाही संबंधित विभाग करणार का, याकडे आता वाहनचालक व नागरिकांचे लक्ष लागले आहे.

The post उडतरे येथील महामार्गावरील सर्विस रोड वरील पथदिवे बंद; रात्रीच्या अंधारामुळे अपघाताचा धोका वाढला appeared first on NIRANJANA NEWS NETWORK.

नागपंचमीनिमित्त उडतरेत महिलांनी जपली पारंपरिक खेळांची परंपरा; झिम्मा-फुगडीने रंगला सण
निरंजना न्यूज नेटवर्क – निलेश बाबर

उडतरे, प्रतिनिधी : निलेश बाबर

नागपंचमीच्या सणानिमित्त उडतरे येथे महिलांनी पारंपरिक खेळांना पसंती देत उत्साहात नागपंचमी साजरी केली. आधुनिक काळात पारंपरिक खेळांचे महत्त्व कमी होत असताना गावातील महिलांनी एकत्र येत झिम्मा, फुगडी, पारंपरिक गाणी यांसह विविध खेळांचा आनंद घेतला. त्यामुळे गावातील वातावरणात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.

नागपंचमी हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेतील महत्त्वाचा सण मानला जातो. पूर्वी नागपंचमीच्या दिवशी गावागावांत महिला एकत्र येऊन विविध पारंपरिक खेळ खेळत असत. मात्र, बदलत्या जीवनशैलीमुळे ही परंपरा हळूहळू कमी होत असल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत उडतरे येथील महिलांनी पारंपरिक खेळांना प्राधान्य देत जुन्या परंपरांना उजाळा दिला.

सणाच्या निमित्ताने महिलांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून एकमेकींसोबत झिम्मा, फुगडी तसेच विविध पारंपरिक खेळ खेळले. यावेळी पारंपरिक गाण्यांनी आणि महिलांच्या उत्साहपूर्ण सहभागाने परिसर दुमदुमून गेला. अनेक महिलांनी आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देत पारंपरिक खेळांचा आनंद लुटला.

पारंपरिक खेळांमुळे वाढला उत्साह

दैनंदिन संसार, घरकाम आणि विविध जबाबदाऱ्यांमध्ये व्यस्त असलेल्या महिलांना नागपंचमीच्या निमित्ताने एकत्र येण्याची आणि मनमोकळेपणाने आनंद साजरा करण्याची संधी मिळाली. त्यामुळे महिलांमध्ये विशेष उत्साह दिसून आला. एकमेकींसोबत संवाद साधत, गाणी म्हणत आणि खेळ खेळत महिलांनी नागपंचमीचा आनंद घेतला.

नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याची गरज

आजच्या डिजिटल युगात मोबाईल, सोशल मीडिया आणि आधुनिक मनोरंजनाच्या साधनांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे पारंपरिक खेळांकडे दुर्लक्ष होत आहे. मात्र, अशा सणांच्या माध्यमातून पारंपरिक खेळ जिवंत ठेवणे गरजेचे असल्याचे मत महिलांनी व्यक्त केले. झिम्मा, फुगडी यांसारखे खेळ केवळ मनोरंजनाचे साधन नसून महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहेत.

महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

नागपंचमीच्या निमित्ताने आयोजित या पारंपरिक खेळांमध्ये महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. अनेक महिलांनी एकत्र येऊन खेळांचा आनंद घेतला. यामुळे काही काळासाठी का होईना, मोबाईल आणि आधुनिक मनोरंजनापासून दूर जात पारंपरिक संस्कृतीचा अनुभव घेता आला.

नागपंचमीच्या निमित्ताने उडतरेतील महिलांनी जपलेली ही परंपरा भावी पिढीसाठीही प्रेरणादायी ठरणारी आहे. सण-उत्सव केवळ धार्मिक विधींपुरते मर्यादित न ठेवता त्यामागील सामाजिक आणि सांस्कृतिक परंपराही जपल्या गेल्या पाहिजेत. उडतरेतील महिलांनी पारंपरिक खेळांना दिलेली पसंती ही त्याच संस्कृतीच्या जतनाची सकारात्मक पाऊल म्हणून पाहिले जात आहे.

The post नागपंचमीनिमित्त उडतरेत महिलांनी जपली पारंपरिक खेळांची परंपरा; झिम्मा-फुगडीने रंगला सण appeared first on NIRANJANA NEWS NETWORK.

उडतरेत काळेश्वर कृषी विज्ञान मंडळाकडून वृक्षारोपण
निरंजना न्यूज नेटवर्क – निलेश बाबर

उडतरे : श्री काळेश्वर कृषी विज्ञान मंडळ, उडतरे या गटाने पानी फाऊंडेशनच्या उपक्रमात सहभाग घेत सामाजिक बांधिलकी जपत बाळासाहेब पवार हायस्कूल उडतरे परिसरात सार्वजनिक वृक्षारोपण केले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत गटाच्या सदस्यांनी विविध वृक्षांची लागवड केली.

या वृक्षारोपण कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य दिलीप बाबर, तालुका कृषी अधिकारी श्री. हरिश्चंद्र धुमाळ, श्री. निखिल रायकर, श्री. तानाजी यमगर, श्री. वंजारी ,निखिल मोरे तसेच गटाचे निमंत्रक सुनील जगताप उपस्थित होते. यावेळी दत्तात्रय जगताप, संजय जाधव, संपत बाबर, राजेंद्र बाबर, तानाजी जगताप, राजेंद्र पवार, शेखर बाबर, उमेश साबळे, रवींद्र जगताप, मधुकर साळुंखे, संभाजी बाबर,मधुकर शेडगे यांच्यासह गटातील सदस्यांनी वृक्षारोपणात सहभाग घेतला.

उडतरे हायस्कूलचे मुख्याध्यापक बनसोडे सर, सोनावणे सर तसेच शाळेतील शिक्षकही यावेळी उपस्थित होते. वृक्षारोपणासोबतच लावलेल्या झाडांचे संगोपन व संवर्धन करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. पानी फाऊंडेशनच्या माध्यमातून गावातील नागरिकांना पर्यावरण संवर्धन, जलसंधारण आणि सामूहिक सहभागाचे महत्त्व पटवून देण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत.

The post उडतरेत काळेश्वर कृषी विज्ञान मंडळाकडून वृक्षारोपण appeared first on NIRANJANA NEWS NETWORK.

यवतेश्वरसह कोटेश्वर मंदिरात श्रावणी सोमवारनिमित्त शिवभक्तांची मोठी गर्दी
निरंजना न्यूज नेटवर्क – निलेश बाबर

श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारनिमित्त सातारा शहराजवळील यवतेश्वर मंदिरासह गोवे-लिंब येथील प्रसिद्ध श्री कोटेश्वर मंदिरात शिवभक्तांची मोठी गर्दी झाली. पहाटेपासूनच दोन्ही ठिकाणी भाविकांची वर्दळ वाढली होती. ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला होता.

सातारा शहरापासून जवळ असलेल्या यवतेश्वर येथील भगवान महादेवाच्या दर्शनासाठी सातारा शहरासह परिसरातील विविध गावांमधून भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले. अनेक भाविकांनी अभिषेक, जलाभिषेक व पूजा-अर्चा केली. भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्याने मंदिर परिसरात दिवसभर गर्दीचे चित्र पाहायला मिळाले. दुचाकी, चारचाकी तसेच खासगी वाहनांमधून भाविक आल्याने यवतेश्वर परिसरातील रस्त्यांवरही वाहनांची वर्दळ वाढली होती. भाविकांच्या सोयीसाठी मंदिर परिसरात आवश्यक व्यवस्था करण्यात आली होती.

दरम्यान, गोवे-लिंब (ता. सातारा) येथील श्री कोटेश्वर मंदिरातही पहाटेपासून शिवभक्तांनी मोठी गर्दी केली. पश्चिम महाराष्ट्रातील लाखो शिवभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री कोटेश्वर देवस्थानाला धार्मिक तसेच ऐतिहासिक महत्त्व आहे. मंदिरातील स्वयंभू शिवलिंगास कृष्णा नदीतील पाण्याने जलाभिषेक करण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. पहाटेपासून दिवसभर दर्शन व जलाभिषेकासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.

श्रावणी सोमवारच्या पार्श्वभूमीवर दोन्ही मंदिरांमध्ये धार्मिक उत्साहाचे वातावरण होते. भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन गोवे-लिंब येथील श्री कोटेश्वर मंदिर परिसरात सातारा तालुका पोलिस ठाण्याच्या वतीने पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी गर्दी व वाहतुकीचे नियोजन केले.

श्रावणातील प्रत्येक सोमवारी यवतेश्वर तसेच कोटेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होत असल्याने आगामी सोमवारीही भाविकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

The post यवतेश्वरसह कोटेश्वर मंदिरात श्रावणी सोमवारनिमित्त शिवभक्तांची मोठी गर्दी appeared first on NIRANJANA NEWS NETWORK.