*आईसाठी ६७०० किमी धावणारा ‘ब्लॅक पॅन्थर’ भुईंजहून भीमाशंकरकडे रवाना*


निरंजना न्यूज नेटवर्क – निलेश बाबर

पाचवड प्रतिनिधी:

आईची प्रकृती चांगली व्हावी, या एकाच भावनेने बिहारचा २१ वर्षीय मोनू ‘ब्लॅक पॅन्थर’ तब्बल ६७०० किलोमीटरचा धावता प्रवास करत आहे. आईसाठी केलेला नवस पूर्ण करण्यासाठी त्याने १५ मार्चपासून घरापासून पायी-धावता प्रवास सुरू केला असून, तब्बल १५१ दिवसांच्या या प्रवासात त्याने अनेक राज्यांचा प्रवास पूर्ण केला आहे बिहारमधील पटना, बेलोरा, बेऊर या मार्गाने महाराष्ट्रात दाखल झालेला मोनू भुईंज येथे पोहोचल्यानंतर पुढील प्रवासासाठी भीमाशंकरच्या दिशेने रवाना झाला. आपल्या आईसाठी त्याने देशातील बारा ज्योतिर्लिंगांच्या दर्शनाचा संकल्प केला आहे. आतापर्यंत वैद्यनाथ, श्रीशैलम आणि रामेश्वरम या तीन ज्योतिर्लिंगांचा प्रवास त्याने पूर्ण केला आहे.
“आईसाठी मी हा नवस केला आहे. तिची प्रकृती चांगली व्हावी, हीच माझी इच्छा आहे.” असे सांगताना मोनूच्या चेहऱ्यावर आईविषयीची आस्था आणि डोळ्यांत भावनिक ओलावा दिसून आला या प्रवासातून केवळ धार्मिक भावना नव्हे, तर व्यसनमुक्ती, व्यायामाचे महत्त्व आणि तरुणांनी देश, धर्मासाठी सकारात्मक कार्य करण्याचा संदेश देण्याचा प्रयत्न असल्याचे मोनूने सांगितले. यापूर्वीही सनातन धर्म जागृती आणि हिंदू राष्ट्राच्या संदेशासाठी त्याने पटना ते काठमांडू, नेपाळ असा धावता प्रवास पूर्ण केल्याचे त्याने सांगितले.
नॅशनल हायवेवरून हजारो किलोमीटर धावत प्रवास करणाऱ्या या तरुणाची जिद्द, श्रद्धा आणि आईवरील प्रेम पाहून भुईंजकरही भारावून गेले. त्याच्या या अनोख्या संकल्पाला प्रोत्साहन देण्यासाठी विकास जाधव (जांब),पत्रकार बापू वाघ, विठ्ठल इथापे (पिंटू शेठ, चिंधवली), सागर शिंदे (शिरगाव), आशुतोष जाधव, प्रमोद निगडे, सुरज भोसले (भुईंज) यांनी प्रवासासाठी आर्थिक मदत केली.


116
कृपया वोट करा

निरंजना न्यूज नेटवर्कच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!