उडतरेजवळ राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीला तातडीने सुरुवात


उडतरे | प्रतिनिधी – निलेश बाबर

निरंजना न्यूज नेटवर्क मध्ये “सर आली धाऊन-रस्ता गेला वाहून ; उडतरे येथील परिस्थिती, दर्जाहीन कामाची पोलखोल” हे वृत्त प्रसिद्ध होताच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) तातडीने दखल घेत उडतरे परिसरातील खराब झालेल्या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली आहे. महामार्गावरील सुमारे २५० मीटरच्या पट्ट्यात पॅचिंगचे काम करून त्यावर डांबर टाकण्यात येणार असून त्यानंतर डबल लेयर (Double Layer) करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे महामार्गावरील डांबरीकरण उखडून मोठमोठे खड्डे पडले होते. या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. या गंभीर समस्येवर निरंजना न्यूज ने वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते.

वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून दुरुस्तीची यंत्रणा कार्यरत केली. त्यामुळे वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र, तात्पुरत्या उपाययोजनेऐवजी दर्जेदार आणि टिकाऊ काम करून भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

चौकट
“सुमारे २५० मीटरच्या भागात पॅचिंगचे काम करण्यात येणार आहे. त्यावर डांबर टाकून त्यानंतर डबल लेयर करण्यात येईल. यापूर्वी डीबीएम (DBM) टाकल्यानंतर अचानक पाऊस सुरू झाल्यामुळे अंतिम प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे टाकलेले डांबर वाहून गेले. आता हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन दर्जेदार काम पूर्ण करण्यात येईल.”

एमडी प्रवीण गायकवाड,
लक्ष्मण तावडे, इंचार्ज, NHAI


117
कृपया वोट करा

निरंजना न्यूज नेटवर्कच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!