निरंजना न्यूज नेटवर्क – सचिन इथापे
सांगली- सातारा विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदार संघातून महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांच्या दणदणीत विजयानंतर किसनवीर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन तथा माजी आमदार मदन दादा भोसले यांनी साताऱ्याच्या सीमेवर भुईंज येथीलभाजपा कार्यकर्त्यां समवेत विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार धैर्यशील कदम यांचे जंगी स्वागत केले. यावेळी मदनदादा भोसले यांनी हा विजय सामूहिक निर्णय आणि सर्व आमदारांच्या एकजुटीचे फलित असल्याचे सांगत मित्र आमदार झाल्याने मनस्वी आनंद होत असल्याचे गौरवोद्गार काढले. नवनिर्वाचित आ. धैर्यशील कदम हे मुंबईहून साताऱ्याकडे प्रस्थान करत असताना साताऱ्याच्या सीमा रेषेवर भुईंज येथील भाजपा कार्यकर्त्यांनी नवनिर्वाचित आ. धैर्यशील कदम यांच्या स्वागतासाठी मोठी गर्दी केली होती. तसेच त्यांच्या आगमनानंतर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत फटाक्यांची आतिषबाजी केली. यावेळी विधान परिषदेचे नवनिर्वाचित आ. धैर्यशील कदम यांनी पक्षाने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली. यावेळी माजी आ. मदनदादा भोसले, वाई पंचायत समितीच्या सदस्या डॉ. सुरभीताई भोसले, युवा नेते विराज (भैय्या) शिंदे, ज्येष्ठ नेते मोहन (आबा) भोसले, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य भैय्यासाहेब जाधवराव, भुईंज चे सरपंच विजय वेळे, पै, मनोज भोसले, चेअरमन मदन शिंदे, जितेंद्र चव्हाण, रमेश चिकणे, रवींद्र भोसले, प्रशांत जाधवराव, लाला (नाना) भोसले, शेखर मोरे, हेमंत भोसले, नारायण धुरगुडे, विकास चव्हाण, मोहन भोसले, ज्ञानेश्वर शेडगे, बळीराम चिकणे यांसह भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.











