उडतरे दि. २४
— नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य दिलीप ज्ञानोबा बाबर यांची प्रचंड मतांनी निवड झाल्याबद्दल भारतीय जनता पक्षाचे दीपक नानवरे मित्र समूह, उडतरे यांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
यावेळी कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ देऊन बाबर यांचा सत्कार केला. त्यांच्या विजयाबद्दल आनंद व्यक्त करत आगामी काळात परिसराच्या विकासासाठी ठोस व लोकाभिमुख कामे होतील, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाला उडतरे गावाचे सुनील जगताप, विवेक जगताप, राजेंद्र जगताप यांच्यासह इतर कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवनिर्वाचित सदस्य दिलीप बाबर यांनी उपस्थितांचे आभार मानत सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन विकासकामे गतीने पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केला.
Views: 336











