निरंजना न्यूज नेटवर्क – निलेश बाबर
उडतरे | दि. २६ :
उडतरे येथील बाळासाहेब पवार हायस्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त शाळेत विविध शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
शाळेच्या मैदानावर विद्यार्थ्यांनी ढोल–लेझीम पथक, कवायत, मल्लखांब आदी प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. विशेषतः लेझीम पथकातील विद्यार्थिनींनी साकारलेल्या विविध थोर व्यक्तिमत्त्वांच्या वेशभूषांनी कार्यक्रमात रंगत आणली.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले,झाशीची राणी ताराबाई-कृतिका पवार,जिजामाता-गौरी पवार, कल्पना चावला- ज्ञानदा कुंभार,संत कान्होपात्रा -वेदिका पवार,तसेच माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील-श्रुतिका पवार,यांसारख्या विविध क्षेत्रातील महान व्यक्तिमत्त्वांच्या वेशभूषेतून विद्यार्थिनींनी समाजप्रबोधनाचा संदेश दिला.
या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, शिस्त व सांस्कृतिक मूल्यांची जोपासना होत असल्याचे चित्र दिसून आले.तसेच याच विद्यालयातील ५ माजी विद्यार्थी मिलिट्री मध्ये भरती झाली असल्यामुळे विद्यालयातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.
या विद्यालयामध्ये मल्लखांबाचे धाडसी प्रकार विद्यार्थ्यांनी केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या कालगुनांना वाव देण्यासाठी कायम तत्पर असणाऱ्या शिवप्रेरणा प्रतिष्ठान तर्फे त्यांना रोख रक्कम आणि ट्रॉफी बक्षीस देण्यात आली.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री दादासो बनसोडे,श्री सोनवणे सर , त्रिवेणी पुजारी मॅडम ,शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष विजय जगताप सदस्य रमेश मोहिते अरविंद शिंगटे ,अनिल बाबर,उडतरे गावच्या सरपंच अर्चना पवार,माजी उपसरपंच मोहन पवार,कांतिलाल पवार,दिलीप बाबर ,शिवप्रेरणा प्रतिष्ठान अध्यक्ष शिवाजीराव बाबर,प्रविण पवार ,प्रदीप बाबर,स्वप्नील निबाळकर,राहुल शिंदे आणि सर्व ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते.











