उडतरे ता वाई येथे भीषण अपघात अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार एक गंभीर जखमी.


निरंजना न्यूज नेटवर्क –

घटना स्थळावरुन मिळलेल्या माहिती नुसार उडतरे येथील उड्डाणपुलावर रात्री ७ वाजता एका दुचाकिस्वारस अज्ञात वाहनाने धडक दिली अपघातात सुरूर (वहागाव)येथील युवराज मोहिते हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्याकडे कामासाठी असलेला नाना चंदू चव्हाण कामगार जागीच ठार झाला.धडक एवढी भीषण होती की पाठोपाठ कंटेनर सहित २ कार पाठोपाठ धडकून मोहिते हे २०० मीटर फरफटत जाऊन पडले.तत्काळ भुईंज पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे आणि सहायक फौजदार शिंदे आणि कन्स्टेबल सपकाळ ट्राफिक चे संतोष कचरे,धुमाळ घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास करत आहेत.

चौकट -भुईंच्या प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका फक्त दिखाव्या साठी…
भुईंज पाचवड उडतारे परिसरात महामार्गावर रोजच एकतरी अपघात होतो. या अपघातात अनेक जण गंभीर जखमी होतात त्यांना तात्काळ उपचाराची गरज असते. परंतु भुईंज प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेसाठी फोन केला असता ही रुग्णवाहिका कधीच अपघातातील गंभीर जखमींच्यासाठी उपलब्ध होत नाही. मग रुग्णवाहिका काय कामाची ?
असा प्रश्न महामार्गावरील वाहनधारक वाहन धारक विचारत असतात.


116
कृपया वोट करा

निरंजना न्यूज नेटवर्कच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!