निरंजना न्यूज –
पाचवड प्रतिनिधी – संजय भाडळकर
जावली तालुक्यातील तीन तरुणांनी एकत्र येऊन नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा व्यवसाय सुरू करूनतरुण पिढीला एक आदर्श घालून दिला आहे याच त्रिमूर्ती उद्योग समूहाचा प्रथमेश दूध डेरी आईस्क्रीम अँड केक शॉप या दालनाचा उदघाटन सोहळा पाचवड (ता वाई ) सोमवार दिनांक 8 रोजी मान्यवरांच्या नातेवाईकांच्या व मित्रपरिवाराच्या हस्ते संपन्न झाला
वाई तालुक्यातील पाचवड मध्ये गोकुळ मिल्क कोल्हापूर संकल्प मिल्क सातारा वारणा दूध कोल्हापूर यासारख्या नामवंत डेरी मिल्क चे प्रॉडक्ट एकाच ठिकाणी आता मिळणार असून दुधापासून सर्व मिळणारे पदार्थ तसेच केटरर्स हॉटेल किराणामाल स्टोअर्स केक शॉप स्वीट मार्ट चायनीज सेंटर बेकरी कोल्ड्रिंक अमृतातुल्य दूध डेरी यांच्या सर्व छोट्या मोठ्या ऑर्डर ही स्वीकारला जातील व माफक व योग्य दरात आता या ठिकाणी मिळणार आहेत
या कार्यक्रमासजावली तालुक्यातील सर्व मित्र परिवार वाई तालुक्यातील सर्व मित्र परिवार व व सर्व नातेवाईक व व्यावसायिक या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होते या सगळ्यांचे स्वागत त्रिमूर्ती उद्योग समूहाने केले











