निरंजना न्यूज – निलेश बाबर
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत गावोगावी लोकसहभागातून आणि श्रमदानातन स्वछतेची मोहीम राबवली जात आहे.
दि ११ रोजी उडतारे ग्रामपंचायत आणि बाळासाहेब पवार हायस्कूल यांच्या सहकार्याने “ कंपोस्ट खड्डा भरू,आपले गाव स्वछ करु” हे अभियान राबवण्यात आले.यावेळी बाळासाहेव पवार हायस्कूल च्या सर्व विद्यार्थ्यांना यामध्ये सहभाग नोंदवला आणि पर्यावरणपुरक या उपक्रमास प्रतिसाद दिला.
गावातील स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन आणि सेंद्रिय खत निर्मिती यांना चालना देण्यासाठी ग्रामपंचायतीने विशेष उपक्रम सुरू केला असून ग्रामस्थांचा प्रतिसाद देखील उत्साहवर्धक मिळत आहे.
ग्रामपंचायतीच्या वतीने घरघरी जाऊन ओला-सुक्या कचऱ्याचे विभाजन, कचरा योग्य पद्धतीने संकलन आणि कंपोस्ट खड्ड्यातील कचरा नियमित भरून त्यातून तयार होणाऱ्या सेंद्रिय खताच्या उपयोगाची माहिती देण्यात येत आहे. यामुळे गावात स्वच्छता वाढून पर्यावरणीय संतुलन राखण्यास मदत होणार आहे.
ग्रामपंचायत सदस्य, स्वछता कर्मचारी, स्वयंसेवक तसेच महिला बचत गट यांच्या सहभागातून गावात जागरूकता मोहिमा, प्रात्यक्षिके आणि साफसफाई उपक्रम राबवले जात आहेत. कंपोस्ट खड्ड्यांमधून तयार होणारे खत स्थानिक पातळीवर शेतीत वापरल्याने शेतकऱ्यांचा खर्चही कमी होईल, असे सरपंच सौ अर्चना पवार यांनी सांगितले.
यावेळी विस्तार अधिकारी श्री शरद गायकवाड,शाखा अभियंता सौ .शितल झरे महामूलकर ,उडतरे ग्रामपंचायत ग्रामसेवक मोहन कोळी,सरपंच सौ अर्चना पवार,उप सरपंच प्रकाश पवार,मा.उपसरपंच मोहन पवार,ग्राम पंचायत सदस्य राहुल शिंदे,उडतरे हायस्कूल मुख्याध्यापक दादासाहेब बनसोडे,प्रकाश सोनवणे,संतोष पवार,किरण बाबर,प्रशांत शिंगटे तसेच ग्राम पंचायत कर्मचारी संतोष कुंभार,किशोर धुमाळ,विनोद बाबर हे उपस्थित होते.











