वाई तालुक्यातील विद्युत ग्राहकांना महावितरण कडून स्मार्ट मीटरची सक्ती* *विद्युत ग्राहकांवर प्रीपेड ची टांगती तलवार* *विद्युत ग्राहक संतप्त*


निरंजना न्यूज- निलेश बाबर

स्मार्ट मीटर च्या नावाखाली वाई तालुक्यात विद्युत ग्राहकांना महावितरणने नेमलेल्या खाजगी कंत्राटदारां कडून स्मार्ट मीटरची सक्ती केली जात असून विद्युत ग्राहकांवर स्मार्ट मीटरमुळे टांगती तलवार आल्याने वाई तालुक्यांमध्ये विद्युत ग्राहकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. वाई तालुक्यात विद्युत ग्राहकांचा स्मार्ट मीटरला विरोध असताना सुद्धा खाजगी कंत्राटदारांकडून घरोघरी जाऊन स्मार्ट मीटरची सक्ती केली जात आहे. एखाद्या घरी पुरुष नसल्यानंतर वयस्कर आई-वडील, व महिला असल्यास त्या ठिकाणी दमबाजी करत स्मार्ट मिटर बसवण्यात येत आहेत. स्मार्ट मीटर ची किंमत प्रीपेड की पोस्टपेड या आणि अशा विविध कारणांनी स्मार्ट मीटरला ग्राहकांचा विरोध वाढताना दिसत आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात विरोध वाढत असल्याने महावितरण व ग्राहकांमध्ये संघर्ष उफाळून येत आहे. सद्यस्थितीत स्मार्ट मीटर पोस्टपेड असल्याचा दावा करणाऱ्या महावितरण ने कायमस्वरूपी पोस्टपेड असे स्पष्ट न केल्याने भविष्यात प्रीपेड ची तलवार विद्युत ग्राहकांवर असणार आहे. महावितरण कडून स्मार्ट मिटर बद्दल अनेक दावे प्रतिदावे केले असले तरी ग्राहकांना प्राप्त होत असलेल्या वीज बिलाची रक्कम पाहून शॉक बसत आहे. त्यामुळे वाढलेले विज बिल कमी करण्यासाठी ग्राहक महावितरणच्या कार्यालयात धाव घेत आहेत. पण बिलाची दुरुस्तीची प्रक्रिया वेळखाऊ असल्याने ग्राहकां मधून संताप व्यक्त होत आहे. ग्रामीण भागातील घरगुती ग्राहकांना टार्गेट करून स्मार्ट मीटर बसवण्यात खाजगी कंत्राटदारांकडून सक्ती केली जात आहे. ग्राहकांचा विरोध असताना सुद्धा त्यांना दमबाजी करून खाजगी कंपनीकडून मनमानी करत त्यांच्यावर स्मार्ट मीटर बसवण्यास येत आहेत. ग्रामीण भागात सर्वत्र स्मार्ट मीटरला विरोध होत आहे. त्यामुळे स्मार्ट मीटर वरून ग्राहक आणि महावितरण यांच्यातील संघर्षाला आणखीनच धार येताना दिसत आहेत.

ग्रामस्थ प्रतिक्रिया-  माझा स्मार्ट मीटरला विरोध असताना सुद्धा मी घरी नसताना स्मार्ट मीटर बसवण्यास आलेल्या कर्मचाऱ्यांनी उद्धट वर्तन करत, स्मार्ट मिटर बसवणे सक्तीचे असल्याचे घरच्यांना सांगितले. दरम्यान, मी त्यांच्याशी फोनवरून संपर्क केला असता त्यांनी अरेरावीची भाषा वापरली. ही बाब योग्य नसून महावितरण अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे. सचिन भोसले. शिरगाव. ग्रामस्थ.


117
कृपया वोट करा

निरंजना न्यूज नेटवर्कच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!