उडतरे येथे दत्तजयंती मोठ्या उत्साहात साजरी


 निरंजना न्यूज नेटवर्क – निलेश बाबर

दि-४-१२-२०२५

उडतरे येथे भगवान दत्तात्रेयांची जयंती मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरी करण्यात आली. पहाटे काकड आरतीने कार्यक्रमांची सुरुवात झाली. त्यानंतर मंदिर परिसरात अभिषेक, पूजन,होम हवन आणि दत्त जन्मकाळ यासह विविध धार्मिक विधी पार पडले.

ग्रामस्थ, महिला मंडळ, युवक मंडळ तसेच भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन घेतले. मंदिर परिसर आकर्षक रोषणाईने सजविण्यात आला होता. नगरभजन, हरिकथा, कीर्तन , श्री संत नामदेव महाराज महिला भजनी मंडळ ,ज्ञानेश्वर भजनी मंडळ ,यांसारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरण अधिक भक्तिमय झाले.

सौ मिनाक्षी अजित सावंत आणि श्री अजित विलास सावंत लिंब – नागेवाडी यांच्या तर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून शेकडो भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला. ग्रामपंचायत, स्थानिक स्वयंसेवी संस्था आणि ग्रामस्थ भैरवनाथ ट्रस्ट चे रमेश पवार,महादेव बाबर,संभाजी निंबाळ्कर,सुरेश बाबर,जिजाबाई जगताप,आबाजी जगताप,विवेक जगताप,मारुती जगताप यांच्या संयुक्त प्रयत्नांतून संपूर्ण कार्यक्रम सुरळीत पार पडला.

दत्त जयंती निमित्त गावात सर्वत्र आनंद व भक्तिभावाचे वातावरण निर्माण झाले होते.


116
कृपया वोट करा

निरंजना न्यूज नेटवर्कच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!