कर थकबाकीदारांना ५० टक्के सवलतीस उडतरे ग्रामपंचायतीचा विरोध


  1. निरंजना न्यूज – निलेश बाबर

उडतरे दि-४

कराची थकबाकी वेळेत व पूर्ण मिळावी यासाठी मिळकतधारकांना करात ५० टक्के सवलत देण्याचा शासन निर्णय घेण्यात आला होता. मात्र, ग्रामपंचायतीचा मुख्य उत्पनाचा स्रोत मालमत्ता कर असल्याने आणि इतर अनुदान वेळेत मिळत नाही. कर थकबाकीवरील ही सवलत देणे आर्थिकदृष्ट्या ग्रामपंचायतीला न परवडणारे असल्याने थकबाकीदारांना निवासी करात कोणतीही सवलत न
देण्याचा निर्णय उडतरे गावच्या ग्रामसभेत घेण्यात आला आहे.

याबाबत सरपंच अर्चना पवार व उपसरपंच प्रकाश पवार यांनी माहिती दिली. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान काळात यावर्षी व गेल्या वर्षीच्या मालमतत्ता करात ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ग्रामपंचायतीला मिळणाऱ्या अनुदानातून विविध कायदेशीर खर्च करणे बंधनकारक आहे. ग्रामपंचायतीला मिळणाऱ्या
उत्पन्नाचा स्रोत नसल्यामुळे उडतरे ग्रामपंचायतीची आर्थिक स्थिती पूर्णपणे मालमत्ता करावर अवलंबून आहे.

एकूण उत्पादनातून १५ टक्के निधी मागासवर्गीय समाजाच्या उन्नतीसाठी, दहा टक्के महिला व बालकल्याण साठी, पाच टक्के दिव्यांगा साठी, ३५ टक्केपर्यंत प्रशासकीय खर्चासाठी, दोन टक्के अतिथी खर्चासाठी ०.२५ जिल्हा निधीसाठी खर्च बंधनकारक आहे. याशिवाय नोकरांचे पगार, दैनंदिन व्यवहार, वीज बिल, देखभाल दुरुस्ती, पाणी शुद्धीकरणासाठी आपत्कालीन खर्च हे न टाळता येणारे नियमित खर्च आहेत. गावात कोणताही अन्य स्वतंत्र
आमालमत्ता कर देखील एक एप्रिल ३१ मार्च वर्षापासून वसूल होतो. त्यामुळे थकबाकीला सवलत न परवडणारी आहे. सवलत दिल्याने होणारे आर्थिक नुकसान शासनाकडून देण्यात येणार नाही. तसेच घरपट्टी, पाणी पट्टी ३० सप्टेंबरपूर्वी भरणाऱ्या करदात्यांना ५ टक्के सूट देऊन कर भरणा करून घेतला आहे. शासनाचा ५० टक्के कर सवलत म्हणजे नियमित कर भरणाऱ्यांवर अन्यायाच आहे. त्यामुळे थकबाकीदारांना ५० टक्के सवलत दिली जाणार नसल्याचा निर्णय घेतल्याचे सरपंच अर्चना पवार यांनी सांगितले.

यावेळी उडतरे गावचे ग्रामसेवक मोहन कोळी.सरपंच अर्चना पवार,उप सरपंच प्रकाश पवार,ग्रामपंचायत सदस्य राहुल शिंदे,नारायण जाधव, सदस्य सुरेखा जगताप,अश्विनी बाबर,ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग संतोष कुंभार ,ऑपरेटर माधुरी मोरे,विनोद बाबर,किशोर धुमाळ आशा सेविका हर्षदा चव्हाण,कोमल शेडगे,कल्याणी बाबर,अंगणवाडी सेविका मीना कांबळे,सविता बाबर,रेखा जाधव,जयश्री जगताप,पूजा पवार ,ग्रामस्थ किशोर कुंभार,शैलेश बाबर,सूरज बाबर,सचिन  पवार,संतोष पवार,वसंत पवार,किरण बाबर,सुनील निंबाळकर,हे उपस्थित होते.


116
कृपया वोट करा

निरंजना न्यूज नेटवर्कच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!