निरंजना न्यूज नेटवर्क (संपादक – निलेश बाबर
भुईंज प्रतिनिधी
किकली ता. वाई गावचे जागृत ग्रामदैवत असलेल्या श्री काळ भैरवनाथ जयंती निमित्त ग्रामपंचायत किकली व भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने किकली येथील भैरवनाथ मंदिरात तरुण वर्ग, महिला बचत गट, आजी माजी सैनिक, ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत भव्य रक्तदान शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले. बालाजी ब्लड बँक सातारा यांचे रक्तदान शिबिरास मोलाचे सहकार्य लाभले. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन वाई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, किकली गावचे उपसरपंच दीपक बाबर, सरपंच प्रसाद गुरव, युवा नेते संतोष बाबर, संदीप बाबर, विजय बाबर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना उपसरपंच दिपक बाबर म्हणाले की, रक्तदान करणे आपले कर्तव्य आणि त्याचबरोबर आपली सामाजिक बांधिलकी देखील आहे. आपण केलेल्या रक्तदानातून एखाद्या रुग्णाचा जीव वाचवणे यासारखे दुसरे पुण्य नसल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. या रक्तदान शिबिरात शंभरहून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी कार्यक्रमास किकली गावासह पंचक्रोशीतील रक्तदाते बहुसंख्येने उपस्थित होते.











