वाकणवाडीच्या आर्यन कारंडेची T20 क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडिया संघात निवड


वाई तालुक्यातील वाकणवाडी गावच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. येथील कु. आर्यन नवनाथ कारंडे याची T20 क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडिया मध्ये गोलंदाज (Bowler) म्हणून महाराष्ट्र-अ संघात निवड झाली आहे.

आर्यनच्या या यशामुळे वाकणवाडी गावासह परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, त्याच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मेहनत, चिकाटी आणि उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर आर्यनने ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

ग्रामीण भागातील खेळाडूंनीही योग्य संधी मिळाल्यास मोठी भरारी घेऊ शकतात, याचे आर्यन हे उत्तम उदाहरण ठरले आहे.

आर्यन कारंडे याला पुढील क्रिकेट कारकिर्दीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात येत असून, भविष्यात तो राज्य व देशाचे नाव उज्ज्वल करो, अशा सदिच्छा व्यक्त केल्या जात आहेत.


95
कृपया वोट करा

निरंजना न्यूज नेटवर्कच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!