उडतरे ग्रामपंचायतीच्या सदस्य पदांसाठी आरक्षण सोडत; ९ जून रोजी विशेष ग्रामसभा


निरंजना न्यूज नेटवर्क : निलेश बाबर

वाई तालुक्यातील उडतरे ग्रामपंचायतीच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी सदस्य पदांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मुदत संपलेल्या व सन २०२६ मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी सदस्य पदांचे आरक्षण निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

यानुसार उडतरे ग्रामपंचायतीमध्ये सदस्य पदांसाठी आरक्षण सोडत काढण्यासाठी दि. ९ जून २०२६ रोजी सकाळी १० वाजता ग्रामपंचायत कार्यालयात विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली आहे.

या विशेष ग्रामसभेत ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागनिहाय सदस्य पदांचे आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग तसेच महिला आरक्षणाची सोडत नियमानुसार काढली जाणार आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या आरक्षण सोडतीकडे गावातील इच्छुक उमेदवारांसह ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. आरक्षण जाहीर झाल्यानंतर गावातील संभाव्य उमेदवारांच्या राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.

ग्रामस्थांनी विशेष ग्रामसभेला उपस्थित राहून आरक्षण प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


95
कृपया वोट करा

निरंजना न्यूज नेटवर्कच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!