निरंजना न्युज नेटवर्क- निलेश बाबर
मा. श्री. निखिल पिंगळे पोलीस अधीक्षक सो सातारा यांनी पोलीस ठाणे स्तरावर ग्राम सुरक्षा दल स्थापन करणेसंदर्भात जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे यांना सुचना दिल्या होते त्याप्रमाणे श्री. निखिल पिंगळे पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक सातारा, श्री. सुनिल साळुंखे उपविभागीय पोलीस अधिकारी वाई विभाग वाई यांचे मार्गदर्शनानुसार आज रोजी भुईंज पोलीस ठाणे येथे पोलीस ठाणे हद्दीतील ग्रामसुरक्षा दलाच्या १०० सदस्यांना टी-शर्टचे वाटप करण्यात आले. ग्रामसुरक्षा दल बळकटीकरण व सक्षमीकरण उपक्रमांतर्गत आयोजित या कार्यक्रमात सदस्यांना त्यांच्या कर्तव्ये व जबाबदाऱ्यांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी त्यांना खालील बाबींची माहिती देण्यात आली :
1. गावात येणाऱ्या फिरत्या विक्रेत्यांची, अनोळखी व्यक्तींची व संशयित हालचालींची माहिती पोलीस ठाण्यास कळविणे.
2. गावात रात्रीच्या वेळी नियमित गस्त घालून चोरी, घरफोडी व इतर गुन्हेगारी घटनांना आळा घालणे.
3. गावात घडणाऱ्या संशयास्पद हालचाली, गुन्हेगारी प्रकार व बेकायदेशीर कृत्यांची माहिती पोलीस ठाण्यास देणे.
4. नैसर्गिक आपत्ती व आणीबाणीच्या प्रसंगी प्रशासन व नागरिकांना मदतकार्य पुरविणे.
5. गावातील यात्रा, उत्सव व सणांच्या काळात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीसांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्तामध्ये सहकार्य करणे.
6. गावातील अवैध व्यवसायांबाबतची माहिती तात्काळ पोलीस ठाण्यास देणे.
7. गुन्हेगारांवर वचक राहण्यासाठी तसेच आपत्कालीन प्रसंगी त्वरित संपर्क साधण्यासाठी पोलीस व ग्रामस्थ यांच्यामधील दुवा म्हणून कार्य करणे.
8. “सुरक्षित गाव, सजग नागरिक” ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी ग्रामसुरक्षा दलाने सक्रिय सहभाग नोंदविणे.
9. गावातील गुन्हे प्रतिबंध, सामाजिक सलोखा व कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनास सातत्याने सहकार्य करणे.
10. ग्रामसुरक्षा दलाची भूमिका अधिक सक्षम व प्रभावी बनवून गावाच्या सुरक्षेमध्ये मोलाचे योगदान देणे.
यावेळी ग्रामसुरक्षा दलाच्या सदस्यांना त्यांच्या कर्तव्यांचे प्रामाणिकपणे पालन करून पोलीस प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.










