* शिवप्रेरणा प्रतिष्ठान उडतरे तर्फे दिनदर्शिकेचे प्रकाशन*


निरंजना न्यूज नेटवर्क – निलेश बाबर

उडतरे (ता. वाई) येथे शिवप्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने दिनांक २९ डिसेंबर २०२५ रोजी काळेश्वर मंदिर परिसरात नववर्षानिमित्त दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. या प्रतिष्ठान च्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेरणादायी विचार यांना अनुसरून विद्यार्थ्यांच्या कालगुनांना वाव देण्याचे
आणि सामाजिक कार्यामध्ये काम करून सामाजिक कार्य करण्याचे उद्दिष्ट असून
या वर्षीची दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आली.
या दिनदर्शिकेचे प्रकाशन महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस प्रतापराव पवार यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी शिवप्रेरणा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव बाबर, उपाध्यक्ष प्रविण पवार, खजिनदार विपीन पवार,सदस्य सुरज बाबर,विष्णू बाबर, माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप बाबर, सातारा जिल्हा खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष कांतीलाल पवार, तसेच प्रविण बाबर ,सुरेश पवार आणि स्वप्नील निबाळकर हे उपस्थित होते.
यावेळी शिवप्रेरणा प्रतिष्ठान तर्फे गावाच्या योगदानाबद्दल प्रतापराव पवार यांचा सत्कार करण्यात आला.

दिनदर्शिका प्रकाशनावेळी उपस्थित मान्यवरांनी शिवप्रेरणा प्रतिष्ठानच्या सामाजिक, सांस्कृतिक व राष्ट्रप्रेम जागवणाऱ्या उपक्रमांचे कौतुक केले. युवकांमध्ये शिवविचार रुजवण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

कार्यक्रमास शिवभक्त, ग्रामस्थ व प्रतिष्ठानचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिनदर्शिकेमुळे समाजात इतिहासाची जाणीव आणि प्रेरणा मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.


117
कृपया वोट करा

निरंजना न्यूज नेटवर्कच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!