*कळंभे येथे कारगिल विजय दिवस शहिद जवान शशिकांत शिवथरे यांच्या स्मृती स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून साजरा*


निरंजना न्यूज नेटवर्क – निलेश बाबर

उडतरे : 26 जुलै

शौर्य पराक्रम आणि देशाच्या थोर सैनिकांच्या बलिदानाचे प्रतीक असलेला कारगिल विजय दिवस मातृभूमीच्या रक्षणासाठी आपल्या प्राणाचे बलिदान दिलेल्या शूर वीरांचा विजय दिवस याचे औचित्य साधून वाई तालुक्यातील कळंभे येथे कारगिल विजय दिनाच्या निमित्ताने शहीद शशिकांत शिवथरे यांच्या स्मृती स्तंभाला कळभे गावचे सुपुत्र माजी सैनिक मच्छिंद्र वाघमारे यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून भावपूर्ण वातावरणात मानवंदना देऊन साजरा करण्यात आला
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना तानाजी शिवथरे म्हणाले की कारगिलचे युद्ध अत्यंत अवघड परिस्थितीत भारतीय जवानांनी लढले या युद्धात भारतीय सैनिकांनी पाकिस्तानचे कंबरडे मोडले व भारतीय जवानांनी नेत्रदीपक यश मिळवले या युद्धात कळंभे गावचे शूरविर जवान सेना मेडल विजेते शशिकांत आबासो शिवथरे यांचा सिंहाचा वाटा होता याचा आम्हा गावकऱ्यांना सार्थ अभिमान आहे असे मनोगत कार्यक्रम प्रसंगी त्यांनी व्यक्त केले
या कार्यक्रमा वेळी माजी सैनिक मच्छिंद्र वाघमारे युवा नेते युवा नेते हणमंतराव गायकवाड ,ज्येष्ठ नागरिक लक्ष्मणराव जाधव ,विजय शिवथरे,तानाजी शिवथरे, रमेश वाघमारे सिताराम पनवेलकर आनंदराव नलावडे विश्वनाथ शिवथरे ,शंकर शिवथरे ,दत्तात्रय शिवथरे ,दादासाहेब शिवथरे ,विनायक गोगावले, बाबासो गायकवाड ,रोहिदास शिवथरे ,यशवंत शिवथरे, संजय शिवथरे ,संतोष गायकवाड तसेच अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते


117
कृपया वोट करा

निरंजना न्यूज नेटवर्कच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!