निरंजना न्यूज नेटवर्क – निलेश बाबर
दि.१/९/ २०२६ : भुईज येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालक पदी खासगी व सहकारी क्षेत्रातील तेरा वर्षाचा अनुभव असलेले व साखर कारखान्यातील चीफ इंजिनिअर म्हणून आठ वर्षाचा अनुभव असलेले कोल्हापूर येथील उत्तम विश्वासराव पाटील यांनी पदभार स्विकारला.
श्री. पाटील यांनी आपल्या कामाची सुरूवात शरद साखर कारखान्यावर चीफ इंजिनिअर म्हणुन केली. सोलापूर येथील पांडुरंग सहकारी साखर कारखान्यावर चीफ इंजिनिअर म्हणुन काम पाहिले असताना २०१३ मध्ये व्हीएसआयकडुन ‘बेस्ट चीफ इंजिनिअर’ म्हणुन गौरविण्यात आलेले होते. युटोपियन शुगर या नव्याने उभारणी करण्यात येत असलेल्या खाजगी साखर कारखान्याची जबाबदारी देऊन कार्यकारी संचालक पदावर नियुक्त करण्यात आले. या कारखान्याची उभारणी केल्यानंतर सात वर्षे कार्यकारी संचालक म्हणुन काम पाहिले. यानंतर उदगीर शुगर ॲण्ड पॉवर या खाजगी कारखान्यावर त्यांनी कार्यकारी संचालक म्हणून काम करीत असताना २०२२ मध्ये भारतीय शुगर मार्फत त्यांना’ बेस्ट कार्यकारी संचालक’ (खाजगी साखर कारखाना) म्हणून गौरविण्यात आलेले होते. श्री. पाटील यांनी आपल्या कामाच्या अनुभवातून चीफ इंजिनिअर ते कार्यकारी संचालक या पदापर्यत मजल मारलेली होती. या अनुभवाच्या जोरावरच उत्तम पाटील यांची किसन वीर-खंडाळा या कारखान्यावर २४ जुन २०२५ रोजी कार्यकारी संचालक म्हणुन नियक्त झालेली होती. किसन वीर-खंडाळा कारखान्यावर मागील सिझनमध्ये कमी दिवसामध्ये जास्त क्रशींग करून आपल्या कामाची चुणूक संचालक मंडळास दाखवून दिलेली होती. नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या मिटींगमध्ये उत्तम पाटील यांची कार्यकारी संचालक म्हणून एकमताने निवड करण्यात आलेली होती.
कार्यकारी संचालक उत्तम पाटील यांचा सत्कार सातारा जिल्हा बँकेचे चेअरमन खासदार नितीन पाटील व व्हार्ईस चेअरमन प्रमोद शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. कारखान्याच्या संचालक मंडळाने त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी संचालक बाबासाहेब कदम, दिलीप पिसाळ, सचिन साळुंखे, रामदास गाढवे, हिंदुराव तरडे, किरण काळोखे,रामदास इथापे, प्रकाश धुरगुडे, संदीप चव्हाण, सचिन जाधव, ललित मुळीक, संजय फाळके, शिवाजीराव जमदाडे, संजय कांबळे, हणमंत चवरे, सुशिला जाधव, कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
*नामदार मकरंदआबांचा विश्वास सार्थ ठरवणार- उत्तम पाटील*
राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री व कारखान्याचे चेअरमन नामदार मकरंदआबा पाटील, खासदार नितीनकाका पाटील व व्हाईस चेअरमन प्रमोद शिदे व संचालक मंडळ किसन वीर कारखाना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करीत आहेत. मी माझ्या अनुभवाचा फायदा किसन वीर व किसन वीर-खंडाळा कारखान्यास देऊन दोन्ही कारखाने अडचणीतुन बाहेर काढण्यासाठी मदत करून नामदार मकरंदआबांनी जो विश्वास माझ्यावर दाखविलेला आहे, तो सार्थ ठरवणार असल्याचे प्रतिपादन, उत्तम पाटील यांनी यावेळी केले.












