बाळासाहेब पवार हायस्कूल उडतरे येथे वटपौर्णिमेच्या दिवशी वटवृक्षारोपण


निरंजना न्यूज नेटवर्क – निलेश बाबर 

बाळासाहेब पवार हायस्कूल उडतरे या ठिकाणी हरित सेने अंतर्गत वटपौर्णिमेच्या दिवशी वडाचे झाड लावून आधुनिक पद्धतीने वटपौर्णिमा साजरी करण्यात आली. विद्यालयाच्या उपशिक्षिका सौ नयना शिंदे मॅडम तसेच श्री शिशिर शिंदे सर यांनी त्यांच्या वाढदिवशी विद्यालयाला वडाचे झाड भेट दिले. विद्यालयामध्ये दरवर्षी वटपौर्णिमेच्या दिवशी वडाचे झाड लावून वटपोर्णिमा साजरी केली जाते. हा उपक्रम मागील चार वर्षापासून विद्यालयात यशस्वीपणे साजरा केला जातो. चार वर्षांपूर्वी लावलेले वडाचे झाड आज शाळेच्या परिसरात बहरत आहे. विद्यालयातील हरित सेना प्रमुख श्री प्रकाश सोनावणे सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री दादासाहेब बनसोडे सर यांच्या उपस्थितीत हा उपक्रम विद्यालयात साजरा करण्यात आला.
विद्यालयामध्ये नेहमीच असे नावीन्यपूर्ण व पर्यावरण पूरक उपक्रम साजरे केले जातात. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री बनसोडे सर, श्री चिंतामणी काटवटे सर, सौ काटवटे मॅडम, ज्येष्ठ शिक्षक श्री पाटील सर, उपशिक्षक श्री सुतार सर, श्री शिंदे सर, सौ शिंदे मॅडम, सौ बाबर मॅडम, सौ पवार मॅडम, सौ पाडवी मॅडम, श्रीमती तनपुरे मॅडम, श्रीमती शिंगटे मॅडम इत्यादी उपस्थित होते.


116
कृपया वोट करा

निरंजना न्यूज नेटवर्कच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!