डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मोफत महाआरोग्य शिबिरास उस्फूर्त प्रतिसाद


पाचवड वार्ताहर- संजय भाडळकर 
पंचशील सामाजिक सेवा मंडळ पाचवड आई प्रतिष्ठान अमृतवाडी आणि वेदांत सेंटर हॉस्पिटल घाटकोपर मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष आरपीआय आठवले गट अशोकराव गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सहकारी साखर कारखाना व्हाईस चेअरमन प्रमोद दादा शिंदे नवलाई पतसंस्थेचे माजी चेअरमन अशोकराव गायकवाड सदस्य प्रदीप शिवथरे माजी सरपंच संजय गायकवाड पंचशील सेवा मंडळाचे सर्व कार्यकर्ते आई प्रतिष्ठान ची सर्व कार्यकारणी तसेच ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व सदस्य या मान्यवरांचे उपस्थिती या शिबिराचे उद्घाटन झाले
या शिबिरात महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत रक्तदाब ब्लड शुगर अस्थमा हाडाची घनता डोळ्याची डोळ्याची तपासणी स्तनाच्या कर्करोगाची शस्त्रक्रिया बायपास सर्जरी किडनी स्टोन तोंडाचा कर्करोग तसेच ज्येष्ठ नागरिक कांसाठी मोफत आधार काठी नोंद अशा अनेक आजारांचे मोफत तपासणी करण्यात आली होती या शिबिरात वेदांत हॉस्पिटल घाटकोपर मुंबई येथील डॉक्टर चंद्रशेखर धोंडे डॉक्टर दिनेश ठाकूर डॉक्टर रोमल शहा डॉक्टर नेहल शहा डॉक्टर अभिषेक जगताप डॉक्टर सहारा खान डॉक्टर अँड डॉक्टर सुरेश साळुंखे डॉक्टर जुई देसाई डॉक्टर अभिजीत शिंदे व सर्व स्टाफ यांनी रुग्णाची तपासणी केली तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र भुईंज व उपकेंद्र पाचवड येथील डॉक्टर व सर्व कर्मचारी यांचेही मोलाचे सहकार्य लाभलेया शिबिरामध्ये एकूण 260 रुग्णांची तपासणीमोफत करण्यात आली


70
कृपया वोट करा

निरंजना न्यूज नेटवर्कच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!