कु. आराध्या सूर्यकांत भोसले हिचे सैनिक स्कूल सातारा प्रवेश परीक्षेत उज्वल यश


निरंजना न्यूज नेटवर्क

भुईंज दि-२

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भुईंज नं. १ च्या विद्यार्थिनी कु. आराध्या सूर्यकांत भोसले हिने सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेत तब्बल 267 गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. या उल्लेखनीय यशामुळे तिची सैनिक स्कूल सातारा येथे निवड झाली असून भुईंज गावासह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण आहे.

आराध्याच्या या यशामागे तिचे कष्ट, जिद्द आणि सातत्यपूर्ण अभ्यासाबरोबरच आई-वडील व आजी-आजोबांचे प्रोत्साहन महत्त्वाचे ठरले. तसेच शाळेच्या प्रमुख मार्गदर्शिका वरिष्ठ मुख्याध्यापिका सौ. सविता संतोष जगताप यांच्यासह सौ. छाया शिंगटे, सौ. मनिषा राऊत, श्री. विजय पवार, सौ. अश्विनी जाधव, सौ. ज्योती ससाणे, श्रीमती शीतल फावडे, श्रीमती सुजाता बोडरे आदी शिक्षकांनी विशेष मार्गदर्शन केले.

यावेळी गावचे प्रथम नागरिक सरपंच मा. श्री. विजय वेळे उपस्थित होते. त्यांनी आराध्याचे व तिच्या कुटुंबीयांचे तसेच सर्व शिक्षकवृंदाचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भुईंज नं. १ च्या या यशामुळे शाळेच्या गुणवत्तेचा व उपक्रमशीलतेचा पुन्हा एकदा ठसा उमटला असून गावाच्या शैक्षणिक प्रगतीस नवे बळ मिळाले आहे.


87
कृपया वोट करा

निरंजना न्यूज नेटवर्कच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!