निरंजना न्यूज नेटवर्क – सचिन इथापे
भुईंज केंद्रा अंतर्गत तेरा शाळांचा ‘बाल आनंद’ मेळावा उत्साहात संपन्न;
भुईंज प्रतिनिधी — भुईंज जिल्हा परिषद केंद्र शाळे अंतर्गत येणाऱ्या तेरा शाळांनी एकत्रितपणे येऊन शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी बाल आनंद मेळाव्या सारखा उपक्रम राबवून शाळेचे नावलौकिक वाढवले आहे. अशा उपक्रमामुळे मुलांमध्ये नेतृत्व गुण, संघ भावना, नियोजन कौशल्य विकसित होत असते हा उपक्रम केवळ मनोरंजना पुरता मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला चालना देणारा ठरत असल्याचे प्रतिपादन डॉ. सुरभीताई भोसले यांनी केले. भुईंज केंद्रा अंतर्गत येणाऱ्या तेरा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांचा ‘बाल आनंद’ मेळावा आसले ता. वाई येथील भवानी मातेच्या मंदिरात मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून वाई पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सदस्य डॉ. सुरभीताई भोसले बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भुईंज जिल्हा परिषद गटाचे सदस्य दिलीप बाबर, वाई पंचायत समिती सदस्य सौ. राणी कांतीलाल पवार, वाई तालुका गटविकास अधिकारी नारायणराव घोलप, गटशिक्षणाधिकारी हर्षवर्धन मोरे, वाई तालुका शिक्षण विस्तार साईनाथ वाळेकर, विस्तार अधिकारी शकील मोमीन, विस्तार अधिकारी दिलीप बाबर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य दिलीप बाबर, पंचायत समिती सदस्य सौ. राणी पवार यांनी आपापले मनोगत व्यक्त केली. यावेळी भुईंज केंद्रा अंतर्गत येणाऱ्या तेरा शाळेतील पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी हिंदी, मराठी गाण्यांवर नृत्य करत उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमा वेळी उडतरे गावच्या सरपंच अर्चना पवार, सामाजिक कार्यकर्ते सुरेश पवार, युवा नेते गणेश शिंदे, पत्रकार जितेंद्र वारागडे, रामचंद्र बाबर, संतोष भोसले, गणेश बाबर, भगवान खरे यांसह अनेक जण उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमास केंद्रप्रमुख ज्ञानेश्वर वेंदे, यांसह मुख्याध्यापिका सौ. सविता जगताप, रमेश निंबाळकर, लीना बंडलकर, हनमंत फरांदे, स्मिता दाभाडे, फरीदा पाटील, विजया माळी, फुंदे सर, कदम मॅडम, हनुमंत सुकलावे, कैलास काळे, राजेंद्र जाधव, सुभाष शेवते, संतोष कुंभार, करुणा मोरे, रमेश चौखंडे, सविता जाधव, सुजाता चिकणे, तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, पदाधिकारी, पालक वर्ग, महिलांची संख्या लक्षणीय होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. सविता जगताप यांनी केले. तर आभार सदाशिव निंबाळकर यांनी मानले.











