निरंजना न्यूज नेटवर्क – निलेश बाबर
वाई पंचायत समितीचे माजी उपसभापती अनिल (आबा) जगताप यांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घर वापसी झाली आहे.
वाई पंचायत समितीचे उपसभापती यांचा पक्ष प्रवेश सोहळा किसन वीर कारखाना कार्यस्थळावर मोठ्या उत्साहात पार पडला. केंजळ गावच्या, गणाच्या व ओझर्डे गटाच्या विकासासाठी एकत्र काम करण्याचा निर्धार आम्ही केला आहे तसेच
“लहानपणापासून काँग्रेस विचारांमध्ये वाढलो. आदरणीय कै. लक्ष्मणराव (तात्या) पाटील यांच्या विचाराने व ना. मकरंद पाटील व खा. नितिन (काका) पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गेली 30 वर्ष काम करत आलो. गेल्या 1 वर्षांपासून आदरणीय खा. शरद पवार साहेबांच्यासोबत काही काळ वेगळा प्रवास झाला, पण आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ना. मकरंद आबांच्या व खा. नितिन काकांच्या मार्गदर्शनाखाली घरवापसी केल्याने नवी ऊर्जा मिळाली आहे. विचार न पटल्याने जिल्हा परिषदेची उमेदवारी मिळत असतानासुद्धा भाजपात जाण्याचा प्रस्ताव नाकारला. यापुढील काळात जुन्या-नव्या कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन युवकांची मजबूत फळी उभी करणार असून पक्ष संघटनेच्या वाढीसाठी प्रामाणिकपणे काम करणार आहे असल्याचे ते सांगत होते.











