पुणे-बेंगलोर महामार्गावर उडतरे येथे भीषण अपघात; रस्त्यावर ऑइल सदृश्य लिक्विड पसरल्याने वाहतूक पर्यायी मार्गाने


निरंजना न्यूज नेटवर्क – निलेश बाबर 

पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील उडतरे येथील हॉटेल शिवनंदन शेजारी रात्री १ च्या सुमारास एक भीषण अपघात झाला. अपघातानंतर वाहनातील सिनिथर्म नावाचे लिक्विड रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पसरल्याने वाहतूक ठप्प झाली होती.सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
घटनेचे गांभीर्य ओळखून भुईंज पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी तत्काळ घटनेची नोंद घेऊन पोलिस प्रशासन, वाहतूक पोलिस आणि किसनवीर भुईंज सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशमन यंत्रणेला त्वरित पाचारण केले. रस्ता निसरडा झाल्यामुळे अपघात टाळण्यासाठी महामार्गावरील वाहतूक ठप्प करून मुख्य रस्त्यावरून सेवा रस्त्याकडे (सर्व्हिस रोड) वळवण्यात आली.
या मदतकार्यात पोलिस हवालदार धायगुडे, ट्रॅफिक हवालदार अजित पवार, कदम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मोलाची भूमिका बजावत वाहतूक सुरळीत केली.

चौकट-महामार्गावर स्वतंत्र अग्निशमन यंत्रणेची गरज; ग्रामस्थांची जोरदार मागणी
या महामार्गावर वारंवार अपघात होत असतात. मात्र, अपघात प्रसंगी तातडीने मदतीला धावून येणारी स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा उपलब्ध नसल्याची समस्या नेहमीच समोर येते.
खाजगी किंवा कारखान्यांचे अग्निशमन बंब घटनास्थळी पोहोचण्यासाठी बराच वेळ लागतो, ज्यामुळे आणीबाणीच्या वेळी मदतकार्यात मोठा विलंब होतो. भविष्यात असा कोणताही अघटित किंवा अनुचित प्रकार घडल्यास तत्काळ मदत मिळावी, यासाठी या महामार्गावर कायमस्वरूपी आणि तत्पर अग्निशमन यंत्रणा उभारण्यात यावी, अशी जोरदार मागणी स्थानिक ग्रामस्थ व वाहनधारकांमधून केली जात आहे.


118
कृपया वोट करा

निरंजना न्यूज नेटवर्कच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!