निरंजना न्यूज नेटवर्क – निलेश बाबर
दि. ६ जानेवारी २०२६ रोजी ओझर्डे येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या कार्यकर्ता मेळाव्या दरम्यान महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मा. मकरंद आबा पाटील यांच्या शुभहस्ते निरंजना न्यूज नेटवर्क या डिजिटल न्यूज पोर्टलच्या दिनदर्शिकेचे भव्य प्रकाशन करण्यात आले.
या प्रसंगी मा. मंत्री मकरंद आबा पाटील यांनी निरंजना न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून समाजहिताच्या, वस्तुनिष्ठ व लोकाभिमुख पत्रकारितेचे कार्य होत असल्याचे गौरवोद्गार काढले. डिजिटल माध्यमांच्या युगात सत्य, पारदर्शकता आणि सामाजिक भान जपत पत्रकारिता करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
निरंजना न्यूज नेटवर्कच्या दिनदर्शिकेमध्ये सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक तसेच प्रेरणादायी विषयांचा समावेश असून ती सर्वसामान्य वाचकांसाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस प्रतापराव पवार,किसनवीर सहकारी करखाण्याचे अध्यक्ष प्रमोद दादा शिंदे,मस्कारभाऊ,कांतिलाल पवार,स्वप्नील निंबाळकर,शैलेश बाबर आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिनदर्शिका प्रकाशनाचा हा सोहळा उत्साहात आणि सकारात्मक वातावरणात पार पडला.










