निरंजना न्यूज – निलेश बाबर
नव वर्षाच्या स्वागतासाठी वाई तालुक्यातील तरुणाई सज्ज झाली असून अनेकांनी नवनवीन बेत आखले आहेत. तालुक्यातील अनेक हॉटेल ढाबा मालकांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजना बरोबर खवय्यां प्रेमींसाठी वेगवेगळ्या ऑफर्स ही देऊ केलेल्या आहेत. नववर्षां मध्ये येणारा ३१ डिसेंबर हा बुधवारी एकादशी दिवशी येत असल्याने मंगळवारीच थर्टी फर्स्ट साजरा करण्याचा बेत अनेकांनी आखला आहे. वाई शहरासह ग्रामीण भागातील हॉटेल सह, ढाबा मालकांनी ही अनेक पर्याय उपलब्ध केले आहेत. मोठ्या हॉटेलमध्ये स्वतंत्र स्क्रीन उभारले असून त्यावर नवी, जुनी गाणी ऐकायला मिळण्यासाठी हॉटेल मालकांनी बरोबर बाराच्या ठोक्याला केक कापून वर्षाचे स्वागत करण्याचे नियोजन केले आहे. नवीन वर्षाच्या सेलिब्रेशन साठी ३१ डिसेंबरच्या रात्री जंगी पार्ट्यांचे बेत आखले जातात. पार्टी आणि कार्यक्रमांमध्ये तरुणाईच आघाडीवर असते. हॉटेल व्यावसायिकांनी ही संधी साधून पार्ट्यांचे आयोजन केले जाते. दरवर्षी थर्टी फर्स्ट जवळ आला की, तो सेलिब्रेट करण्याचे विविध बेत आखण्याचे काम दहा-पंधरा दिवस अगोदरच सुरू होते. थर्टी फर्स्ट साठी दोन दिवस शिल्लक राहिले असल्याने तरुणाईने नवनवीन फंडे जोर धरू लागले आहेत. शहरासह ग्रामीण भागातील तरुण वर्गाला हॉटेलमध्ये थर्टी फर्स्ट च्या संध्याकाळपासून ते रात्रीपर्यंत बॉलीवूड आणि हिपहॉप गाण्यावर बेधुंद होऊन नाचायचे वेड लागले आहे. यामध्ये कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक प्रमाणात आहे. कित्येक मित्र मैत्रिणींनी ग्रुपने आजूबाजूला भटकंती करायची आणि वर्षभरातील आठवणींना उजाळा द्यायचा तसेच तेथे तेथेच जवळपास असणाऱ्या हॉटेलवर मस्तपैकी जेवण करायचे नियोजन आखले आहे. ‘खा प्या मजा करा’ आणि आनंद लुटा या संकल्पने पेक्षा अधिक व्यापक पद्धतीने ३१ डिसेंबरचा दिवस एन्जॉय करण्याचा ट्रेड गेल्या काही वर्षात रूढ झाला आहे. मोठमोठ्या हॉटेलमध्ये व ढाब्यांवर पार्ट्यांचे आयोजन आणि कुटुंबासाठी विशेष कार्यक्रमाचे नियोजन यासह हॉटेल्स मालकांनी नियोजन केले
– बुधवारी ३१ डिसेंबरला एकादशी असल्याने मंगळवारी दुपारपासूनच नियोजित ठिकाणी जल्लोष करण्याचे नियोजन तरुणांनी केली आहे. सरत्या वर्षात चांगल्या आणि वाईट गोष्टींचा मागोवा घेतला जातो. काही गोष्टी ठरवूनही झाल्या नसतील तर नव्या वर्षात पहिल्या दिवसापासून करायचा मनोमन संकल्प करताना तरुणाई दिसते.
– *पोलिसांची करडी नजर*- नववर्षाचे स्वागत करण्यासाठी तरुणाई कडून वेगवेगळ्या पार्टीचे प्लॅन सुरू असून मद्य सेवनाचे प्रमाण अधिक प्रमाणात आढळून येते. त्यामुळे पोलिसांकडून ड्रंक अँड ड्राईव्ह ची कारवाई देखील केली जाते. यंदाही वाई शहरासह ग्रामीण भागात ड्रंक अँड ड्राईव्ह विरोधात पोलिसांकडून मोहीम राबवली जाणार आहे. एकंदरीतच थर्टी फर्स्ट च्या पार्श्वभूमीवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे.










