निरंजना न्यूज -निलेश बाबर
पाचवड पंचायत समिती गण म्हणजे वाई तालुक्यातील राजकीय समीकरण घडवणारा गण परंतु सत्तेच्या लालसी भाजपच्या स्वयंघोषित नेत्यांनी पाचवड गणाचे राजकारण पुरते बिघडवून टाकले असले तरी बहुजनांचा आदर मान सन्मान करणाऱ्या राष्ट्रवादी पक्षाच्या सर्व सामान्य कार्यकर्त्यांनी पाचवड गणात घड्याळाचाच गजर करण्याचा निर्धार केला आहे. पाचवड पंचायत समिती गणातील मतदार जनता सौ. राणी पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली असून स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित दादांच्या घड्याळाचा गजर करून दादांना खरी श्रद्धांजली अर्पण करणार आहेत. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी पाचवड गणात केलेली कोट्यावधी रुपयाची विकास कामे त्यामुळे कार्यकर्ते जनतेने गणात घड्याळाच्या विजयाचा गजर पक्का केला आहे. या गणातील कार्यकर्त्यांसाठी मंत्री मकरंद आबांचा शब्द म्हणजे शाश्वत विकासाचे प्रमाण मानला जातो. आबांच्या या विकासाच्या जोडीला ज्येष्ठ नेते कांतीलाल पवार यांचा जनसंपर्क व राजकीय अनुभव गट व गणातील सर्वसामान्य जनतेला सोबत घेत घड्याळाचे काटे गतिमान करण्यासाठी सज्ज झाले आहेत. जवळपास गेल्या पंचवीस तीस वर्षापासून पाचवड गणामध्ये गावागावातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी आपापसातील मतभेद विसरून सौ. राणी पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये पाचवड गणातील राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते व जनतेने मंत्री महोदयांच्या शब्दाला किंमत देताना मोठी संयमी भूमिका बजावताना सौ. राणी कांतीलाल पवार यांनाच निवडून आणण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. पाचवड पंचायत समिती गण राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला आहे. तो असाच अबाधित ठेवण्याची शपथ पाचवड येथील कार्यकर्त्यांनी घेतली आहे. पाचवड पंचायत समिती गणात घडयाळाचाच गजर करण्यासाठी अतिशय ताकतीने व प्रामाणिक काम करत असल्याने सौ. राणी कांतीलाल पवार या एक हाती बाजी मारणार एवढं मात्र नक्की…











