निरंजना न्यूज नेटवर्क – निलेश बाबर
खडकी ता,वाई
आज दिनांक 12/1/2026 रोजी मौजे *खडकी* येथील *शेतीनिष्ठ शेतकरी श्री प्रशांत भिकू शिंगटे* यांच्या प्रक्षेत्रावरती *सुपर केन नर्सरी प्रात्यक्षिक* तसेच नाविन्यपूर्ण उपक्रम *फुलशेती ,झिरो टिलेज शेती ,व स्ट्रॉबेरी शेती* याबाबत पाहणी व मार्गदर्शन करण्यात आले त्यावेळी मंडळ कृषी अधिकारी भुईंज श्री निखिल रायकर साहेब,उप कृषी अधिकारी भुईंज श्री बनकर साहेब,सहाय्यक कृषी अधिकारी जगदाळे साहेब तसेच सहाय्यक कृषी अधिकारी शेळके साहेब, कोळेकर साहेब यांनी मार्गदर्शन व प्रात्यक्षिक केले.
यावेळी श्री प्रशांत शिंगटे यांनी सुपर केन नर्सरी साठी बेड कसा तयार करायचा, बीज प्रक्रिया कशी करतात,बीज प्रक्रिया करण्यासाठी जलकुंड कशाप्रकारे तयार करायचे,बीज प्रक्रिया करण्यासाठी कोणकोणती रसायने जसे क्लोरोपायरीफॉस, बाविस्टीन व चुन्याची निवळी मिसळून बीज प्रक्रिया कशी व किती वेळ करावी, बीज प्रक्रिया झाल्यावर उसाची कांडी बेडवर कशी मांडायची व त्यावर जिवाणू फवारणी करून मातीचा थर देऊन बेडवरची प्रक्रिया कशी पूर्ण करायची याचे प्रात्यक्षिक केले. सुपर केन नर्सरी तयार करताना घ्यावयाच्या काळजी संदर्भात बियाणे निवड ,बियाणे कटिंग करणे, बियाणे प्रक्रिया कालावधी,बियाणे मांडणी याबाबत काय काळजी घ्यावी याची माहिती दिली
शिवार गप्पा मधून सुपर केन नर्सरी तयार करण्याचे फायदे इतर ऊस रोपे तयार करण्याच्या पद्धती यातील फरक व फायदा यावर चर्चा केली. सुपर केन नर्सरी सामान्य शेतकऱ्यालाही तयार करण्यासाठी सोपी व फायदेशीर कशी आहे याबद्दल चर्चा केली सुपर केन नर्सरी मध्ये तयार झालेली रोपे आपल्या मातीत व आपल्या वातावरणात तयार होतात त्यामुळे शेतात लवकर सेट होण्यास मदत होते. तसेच इतर रोपांच्या किंमतीच्या तुलनेत सुपर केन नर्सरी मध्ये तयार झालेली रोपे अत्यंत कमी खर्चात तयार होतात .आपण स्वतः आपल्या शेतातील चांगल्या प्रकारचे ऊस बियाणे वापरल्यामुळे आपली सुपर केन नर्सरीची रोपे उत्कृष्ट, जोमदार, निरोगी तयार होतात अशा प्रकारे कमी खर्चाच्या सुपर केन नर्सरी चा वापर सर्व शेतकऱ्यांनी आपल्या शेतावर करावा व उत्पादन वाढीस प्राधान्य द्यावे असे आव्हान मंडल कृषी अधिकारी भुईंज ,श्री. रायकर साहेब यांनी केले तसेच श्री प्रशांत भिकू शिंगटे शेतीनिष्ठ शेतकरी खडकी यांनी वेळोवेळीआपल्या शेतावर नवनवीन प्रयोग करून आपल्या शेतावर इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शक प्रक्षेप तयार केले आहे याचा लाभ इतर शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन केले श्री प्रशांत शिंगटे यांचे फुल शेतीमधील प्रयोगाचे नवनवीन जातीच्या फुलपिक प्रात्यक्षिकांचे तसेच झिरो टीलेज कल्टिवेशन प्रात्यक्षिकाचे श्री रायकर साहेब यांनी कौतुक केले व श्री प्रशांत शिंगटे यांचे शेतीतील हे कार्य इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरेल असा विश्वास व्यक्त केला











