निरांजना न्यूज-निलेश बाबर
उडतरे दि-२९
ऊस पिकातील वाढता खर्च लक्षात घेता उसाची दर्जेदार व अत्यंत कमी खर्चात रोपे तयार करण्याची पद्धत म्हणजेच सुपर केन नर्सरी तंत्रज्ञान पद्धतीने जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी रोपे तयार करावीत असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी वाई श्री संतोषकुमार बरकडे यांनी केले.मौजे उडतरे येथे श्री सुनील जगताप यांच्या प्रक्षेत्रावर सुपर केन नर्सरी पद्धतीने ऊसाची रोपे तयार करण्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
ऊस पिकाची दर्जेदार व कमी खर्चात रोपे आपण या पद्धतीने करू शकतो, त्यामुळे सर्वच शेतकरी यांनी याचा वापर करावा असेही श्री बरकडे यांनी सांगितले.तालुका कृषि अधिकारी श्री हरिश्चंद्र धुमाळ यांनी या पद्धतीचे फायदे उपस्थित शेतकऱ्यांना सांगितले.तसेच ज्या शेतकऱ्यांना या पद्धतीने रोपे तयार करायची असतील त्यांनी मंडळ कृषि अधिकारी, उप कृषि अधिकारी, सहाय्यक कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन श्री धुमाळ यांनी केले
सहाय्यक कृषि अधिकारी श्री तानाजी यमगर यांनी यावेळी सुपर केन नर्सरी तयार करण्याची पूर्ण पद्धत शेतकऱ्यांना समजून सांगितली ,मंडळ कृषि अधिकारी अधिनस्त सर्व कर्मचारी यांनी उपस्थित शेतकरी यांना संपूर्ण प्रात्यक्षिक दाखविले.यावेळी मंडळ कृषि अधिकारी वाई श्री रवींद्र बेलदार, मंडळ कृषी अधिकारी भुईंज श्री निखिल रायकर, उप कृषि अधिकारी श्री निखिल मोरे,किरण बाबर व मंडळ कृषि अधिकारी वाई अधिनस्त सर्व कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.











