विकासकामांसाठी अन् जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी ही निवडणूक लढणार – दिलीप बाबर


निरंजना न्यूज नेटवर्क – निलेश बाबर

वाई तालुक्यातील भुईंज जिल्हा परिषद गटातून उडतरे येथील  माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप बाबर यांनी दंड थोपटले आहेत असून  केवळ जिल्हा परिषद गटातच नव्हे तर वाई मतदार संघात दिलीप बाबर यांचे राजकीय वलय असल्याने त्यांच्या विजयाचा मार्ग निश्चित असल्याची जोरदार चर्चा आहे त्यांच्या मतदार संघात आहे.

दिलीप बाबर यांनी भुईंज जिल्हा परिषद गटाची निवडणूक लढवावी, अशी गळ लोकांमधून त्यांना घातली जात आहे. त्यांच्याकडे असलेला जनसंपर्क ,विकासाचे व्हिजन, लोकांची कामे करण्यासाठी त्यांच्याकडून केली जाणारी धडपड पाहता त्यांच्या उमेदवारीसाठी लोकाग्रह वाढत आहे.

दिलीप बाबर हे स्वर्गीय लक्ष्मण पाटील आणि मंत्री मकरंद पाटील यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जात होते. मात्र राष्ट्रवादीच्या फुटीनंतर बाबर यांनी शरद पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. सध्या ते मकरंद पाटील यांच्यासोबत नसले
तरी पक्षातील जुने जाणते पदाधिकारी कायम त्यांच्या संपर्कात आहेत. दिलीप बाबर हे यापूर्वीही जिल्हा परिषद गटातून निवडून आले आहेत. जिल्हा परिषद सदस्य पदाच्या कारकिर्दीत त्यांनी गटातील गावांमधील
रस्त्यांची कामे, स्मशानभूमीची कामे, पाणंद रस्ते, ओढ्यांवरील बंधाऱ्यांची कामे यासह अनेक कामांचा निपटारा केल्याने लोकांचा त्यांच्यावरील विश्वास कायम आहे.

जिल्हा परिषदेचा कार्यकाळ संपल्यानंतरही ते कायम लोकांच्या संपर्कात राहिले आहेत. त्यांच्या वैयिक्तीक अडीअडचणी सोडवण्यासाठीही त्यांची धडपड थक्क करणारी राहिली आहे. आजवर केलेल्या कामाची पोहोचपावती त्यांना आगामी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये मिळू शकते.


66
कृपया वोट करा

निरंजना न्यूज नेटवर्कच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!