निरंजना न्यूज नेटवर्क
भुईंज दि-११
गेल्या काही दिवसांपासून भुईंज,पाचवड,उडतरे,जांब,खडकी इत्यादी भागात शेतकऱ्यांच्या मोटर आणि केबल चोरीच्या घटनांत वाढ झाली असताना मौजे उडतरे (ता. वाई) येथे शेतातील पाण्याची मोटार चोरी केल्याप्रकरणी भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता यावेळी भुईंज पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली होती.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 10 मार्च 2026 रोजी सायंकाळी 5 ते 11 मार्च रोजी सकाळी 10 वाजण्याच्या दरम्यान उडतरे गावच्या हद्दीत खडकी रोडवरील ‘विसावा’ शिवारातील कुडाळी नदीच्या काठावर बसवलेली LUBI कंपनीची 3 हॉर्स पॉवर पाण्याची मोटार अज्ञात चोरट्याने चोरून नेली.
याप्रकरणी विशाल वसंत जगताप (वय 37, रा. उडतरे, ता. वाई) यांनी भुईंज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गु.र.नं. 72/2026 हा गुन्हा भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303(2) अंतर्गत दाखल करण्यात आला आहे.
तपासादरम्यान पोलिसांनी रुपेश संतोष मोरे (वय 19) व दीपक संतोष मोरे (वय 26), रा. कळंबे या दोघांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार सपकाळ हे करत असून गुन्हा दाखल करण्याचे काम म.पो.हवालदार ननावरे यांनी केले आहे.












