पाचवड गणात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मोठा विजय सौ. राणी कांतिलाल पवार प्रचंड मतांनी विजयी


निरांजना न्यूज – निलेश बाबर

पाचवड गणात झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत उमेदवार सौ. राणी कांतिलाल पवार यांनी प्रचंड मताधिक्याने दणदणीत विजय मिळवला आहे. सुरुवातीपासूनच मतमोजणीत आघाडी घेत सौ. पवार यांनी विरोधकांवर निर्णायक मात केली.तब्बल १५५० मतांनी आघाडी करून विजयाची पताका फडकवली .

संपूर्ण प्रचारादरम्यान सौ. राणी कांतिलाल पवार यांनी थेट जनसंपर्क, विकासाभिमुख भूमिका आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर ठाम भूमिका मांडली. याचाच कौल मतदारांनी या निकालातून दिला असल्याचे दिसून येते.

विजयानंतर पाचवड गणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व समर्थकांनी जल्लोष करत फटाक्यांची आतषबाजी केली. “विकासाचा विजय” आणि “जनतेच्या विश्वासाचा विजय” अशी प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे.

या विजयामुळे पाचवड गणात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे स्थान अधिक भक्कम झाले असून आगामी काळात सर्वांगीण विकासाला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


66
कृपया वोट करा

निरंजना न्यूज नेटवर्कच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!